Hot Posts

6/recent/ticker-posts

कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे कृषि महाविद्यालय बार्शी येथे प्रथम वर्षाच्या विध्यार्थ्यांचा स्वागत समारंभ संपन्न

 कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे कृषि महाविद्यालय बार्शी येथे प्रथम वर्षाच्या विध्यार्थ्यांचा स्वागत समारंभ संपन्न 

बार्शी (कटूसत्य वृत्त):- कृषि शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी  कृषि क्षेत्रात येत असलेले नवनवीन तंत्रज्ञान अभ्यास करून त्याचा वापर शेतकऱ्याच्या फायद्यासाठी करावा तसेच स्पर्धा परीक्षाचा अभ्यास करून आपल्या आई-वडिलांचे नाव मोठे करावे असे अवाहन श्री.शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे खजिनदार जयकुमार शितोळे यांनी कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे कृषि महाविद्यालय बार्शी येथील प्रथम वर्ष विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभप्रसंगी अवाहन केले.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूर येथील शासकीय घटक कृषितंत्र विद्यालयाचे प्राचार्य डॉ.जे.डी. जाधव ,वरिष्ठ संशोधक सहाय्यक जे .बी .पाटील , कृषि विभाग बार्शी चे कृषि पर्यवेक्षक सयाजी गायकवाड तसेच , महात्मा फुले कृषि विद्यापीठ ,राहुरी येथील वनस्पती विकृती विभागाचे सेवानिवृत्त विभाग प्रमुख डॉ.डी .एन पाडुळे हे उपस्थित होते.


कार्यक्रमादरम्यान बोलताना प्रमुख पाहुण्यांनी बदलते हवामान , स्पर्धा परीक्षा व भारताच्या आर्थिक जडणघडणीमध्ये कृषि क्षेत्राचे असलेले योगदान याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच विद्यार्थ्यांकडून कृषि क्षेत्रामध्ये काही चांगले बदल होतील अशी अपेक्षा व्यक्त केली.

या कार्यक्रमाची प्रस्तावना प्राचार्य गलांडे पी. आर , सुत्रसंचालन डॉ.बर्गे एम. एस, व प्रा. घुटके टी.डी. यांनी केली तर पाहुण्यांची ओळख प्रा. बोनगे व्ही. ई.यांनी करून दिली  तर आभार प्रदर्शन डॉ.शेंडे एस .एस. यांनी केले.

Reactions

Post a Comment

0 Comments