सैनिकी मुलांचे वसतिगृह येथे निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात एकत्रित मानधनावरील पदाची भरती - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, October 11, 2024

सैनिकी मुलांचे वसतिगृह येथे निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात एकत्रित मानधनावरील पदाची भरती

 सैनिकी मुलांचे वसतिगृह येथे निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात एकत्रित मानधनावरील पदाची भरती


सोलापूर (कटूसत्य वृत्त):-जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सोलापूर यांचे अधिपत्याखालील सैनिकी मुलांचे वसतिगृह, सोलापूर येथे निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात एकत्रित मानधनावर माळी-01 पद भरावयाचे आहे. माळी पदाचा अनुभव असणाऱ्यास प्राधान्य देण्यात येईल. मानधन रूपये 13089/- प्रतिमहा असेल. माळी पद हे माजी सैनिक प्रवर्गातून भरावयाची असून सोलापूर जिल्हयातील माजी सैनिक यांनी आपले अर्ज सैनिक सेवेची व इतर शैक्षणिक कागदपत्रासह दिनांक 17 ऑक्टोबर 2024 रोजी प्रत्यक्ष या कार्यालयात सादर करावे व सदर पदाकरिता त्याच दिवशी मुलाखती घेण्यात येतील. तरी उमेदवारांनी स्वत:ची मुळ कागदपत्रे सोबत आणावीत. सदर पद भरतीसाठी माजी सैनिकांना प्राधान्य देण्यात येईल. माजी सैनिक उपलब्ध न झाल्यास नागरी जीवनातील उमेदवारांचा विचार केला जाईल. तरी सोलापूर जिल्हयातील पात्र व गरजू माजी सैनिकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, सोलापूर यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages