सोलापूर जिल्ह्याला ज्वारी पिकाचे 85 हजार मिनिकिट उपलब्ध - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, October 11, 2024

सोलापूर जिल्ह्याला ज्वारी पिकाचे 85 हजार मिनिकिट उपलब्ध

 सोलापूर जिल्ह्याला ज्वारी पिकाचे 85 हजार मिनिकिट उपलब्ध


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- अन्न आणि पोषण सुरक्षा अभियान – पौष्टिक तृणधान्य सन 2024-25 अंतर्गत रब्बी हंगामात ज्वारी पिकाचे मिनिकिट या बाबीचे नियोजन करण्यात आलेले आहे. या करीता चालू वर्षी ज्वारी पिकाचे मिनिकिट 4 किलो प्रति मिनिकिट पॅकींग साईजमध्ये लक्षांक प्राप्त आहे.ज्वारी मिनिकिटसाठी एका शेतकऱ्याला आवश्यक असणाऱ्या बियाणांचे 4 किलो प्रमाणे एक मिनिकिट लाभ देय असणार आहे. सोलापुर जिल्हयासाठी 85 हजार 880 मिनिकिट लक्षांक असुन त्यासाठी 3435.20 क्विंटल बियाणे उपलब्ध होणार असुन शेतकऱ्यांनी संबंधित तालुका कृषि अधिकारी, कृषि सहाय्यक यांच्याशी संपर्क साधुन बियाणे उपलब्ध करून घ्यावे. हे बियाणे तालुकास्तरावर उपलब्ध होणार आहे.यामध्ये फुले सुचित्रा व परभणी सुपर मोती या वाणांचा समावेश आहे. तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी प्रमाणीत बियाणे घटकाचा लाभ घ्यावा असे आवाहन  जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages