दक्षिण सोलापूर विधानसभेचे काँग्रेसचे इच्छुक उमेदवार महादेव कोगनुरे यांनी दिली मुलाखत
दक्षिण ची उमेदवारी आपल्यालाच मिळणार- महादेव कोगनुरे

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे इच्छूक उमेदवार एम के फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनुरे यांनी काँग्रेस भवन सोलापूर येथे आपला कार्य अहवाल सादर करीत काँग्रेसचे खासदार डॉ. शिवाजीराव काळगे यांच्या उपस्थितीत मुलाखत दिली. मुलाखत देऊन बाहेर पडताना पत्रकाराशी बोलताना महादेव कोगनुरे म्हणाले की, जनमानसांनी दिलेल्या आशीर्वादाच्या जोरावर आणि माझे मार्गदर्शक व पक्ष श्रेष्ठी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे व नुतन खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या सहकार्यामुळे यंदा दक्षिण सोलापूर विधानसभेची उमेदवारी नक्की आपल्यालाच मिळणार असल्याचे विश्वास यावेळी महादेव कोगनुरे व्यक्त केला.यावेळी एम के फाउंडेशन व काँग्रेस चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments