Hot Posts

6/recent/ticker-posts

काय झाडी, काय डोंगर फेम आमदार शहाजी पाटील यांचे खंदे समर्थक श्री चंद्रशेखर काटे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश..!

 काय झाडी, काय डोंगर फेम आमदार शहाजी पाटील यांचे खंदे समर्थक  चंद्रशेखर काटे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश..!

सांगोला(कटूसत्य वृत्त):-सांगोला तालुक्याचे शिंदे गटाचे आमदार शहाजी पाटील यांचे निकटवर्तीय म्हणून संपूर्ण सांगोला तालुक्याला परिचित असणारे चंद्रशेखर काटे यांनी शहाजी पाटील यांना आज सोडचीटी दिली.  चंद्रशेखर काटे यांनी शहाजी पाटील यांच्यासाठी अनेक वर्ष कार्यकर्त्यांची फौज तयार केली होती, परंतु शहाजी पाटलांची गद्दारी त्यांच्या जिव्हारी लागल्यामुळे त्यांनी आ. शरद पवार साहेब यांचा नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये  जिल्हाध्यक्ष आ. बळीराम काका साठे यांच्या  हस्ते पक्ष प्रवेश वडाळा येथे करण्यात आला. यावेळी त्यांनी त्यांचे असंख्य कार्यकर्ते घेऊन शक्तिप्रदर्शन केले, या पक्षप्रवेशासाठी जिल्हा संघटक संजय जाधव व राष्ट्रीय छावा संघटनेचे उत्तर तालुका अध्यक्ष  रतिकांत पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले. यावेळी  चंद्रशेखर काटे यांचे विशेष सहकारी विजय चव्हाण, विजय बाजारे, अजित तांबोळी, संतोष देशमुख, धनजय विभुते, संतोष गुरव, सहील सरतापे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी जाहीर पक्षप्रवेश केला. यावेळी  मनोज साठे,  जितेंद्र शिलवांत,  नागेश पवार,  गणेश पाटील,  महेश बोराडे यांची प्रमुख उपस्थिती होती..!

Reactions

Post a Comment

0 Comments