कोर्टी येथे माझी वसुंधरा अभियांनांतर्गत पर्यावरण पूरक
घंटागाडीचा शुभारंभ..
कोर्टी (कटूसत्य वृत्त):- पंढरपूर तालुक्यातील कोर्टी येथे स्वच्छ भारत मिशन अंतर्गत घनकचऱ्याचे विलगीकरण करून प्रकिया करणेसाठी पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक घंटा गाडीचा शुभारंभ 15 वा वित्त आयोग या योजनेअंतर्गत रविवार दि. 13 फेब्रुवारी 2024 रोजी कोर्टी चे सरपंच राजू पवार व विठ्ठल कारखान्याचे संचालक बाळासाहेब हाके रामभाऊ मिसाळ यांचे हस्ते संपन्न झाला . याच वेळी कोर्टी येथील ग्रामस्थांना घरातील कचरा गोळा करण्यासाठी करण्यासाठी बकेट वाटप करण्यात आले. माझी वसुंधरा 4.0 अभियानांतर्गत भूमी,अग्नी, वायू, जल व आकाश या पाच तत्वांचे संवर्धन करण्यासाठी कोर्टी हे गाव मोठ्या हिरारीने सहभागी आहे. कचऱ्याचे व्यवस्थापन करून ओला कचरा,सुका कचरा, प्लॅस्टिक कचरा विलगीकरण करण्यासाठी पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक घंटागाडी सुरू केली आहे. ही घंटागाडी गावातील प्रत्येक कुटुंबाच्या घरी जाऊन कचऱ्याचे संकलन करेल. गोळा केलेला कचरा वाहतूक करून कचरा संकलन केंद्रात साठवला जाईल.
सर्व ग्रामस्थांनी आपल्या घरातील कचरा घंटागाडीला देऊन कचरामुक्त गाव करण्याची प्रतिज्ञा घेतली आहे. ग्रामपंचायतच्या या उपक्रमाचे सर्वांनी स्वागत केले.शंभू महादेवाचे पदस्पर्शाने पावन झालेल्या कोर्टी गावामध्ये देवाचे सुप्रसिद्ध शंभूमहादेवाचे हेमाडपंथी मंदिर आहे. देवाच्या दर्शनासाठी महाराष्ट्र राज्यातून लाखो भाविक मोठ्या भक्ती भावाने येतात. भाविकांच्या व गावातील नागरिकांच्या सोयीसाठी नवनवीन उपक्रम राबवण्यासाठी ग्रामपंचायत कोर्टी सदैव प्रयत्नशील असते.
यावेळी सरपंच सौ. शोभा अनिल पवार उपसरपंच मुन्ना शेख, ग्रामसेवक खंडागळे माजी सरपंच रामभाऊ मिसाळ राजू पवार भारत पवार महेश येडगे ग्रामपंचायत सदस्य, पोपट हाके, मधुकर वाघमारे बबलू शेख, सिकंदर मुलांनी अनिश पाटील नाना हाके, आगतराव बाबर बाळू होनकडे धनाजी सकटे समाधान शेंडगे शरीफ शेख जमीर शेख व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते , .
0 Comments