Hot Posts

6/recent/ticker-posts

लक्ष्मी टाकळी येथे भव्यदिव्य प्रवेशद्वाराचे उद्घाटन संपन्न सरपंच संजय साठे यांच्या प्रयत्नाला यश

  लक्ष्मी टाकळी येथे भव्यदिव्य प्रवेशद्वाराचे उद्घाटन संपन्न

सरपंच संजय साठे यांच्या प्रयत्नाला यश

पंढरपूर ,(कटूसत्य वृत्त):- पंढरपूर शहरालगत असणाऱ्या लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायतीला गेल्या ७० वर्षापासून प्रवेशद्वार नव्हते हे दिवास्वप्न दसऱ्याच्या मुहूर्तावर सरपंच संजय साठे व त्यांच्या सहकार्यानी विविध विकास कामाचे भूमिपूजन करत पूर्ण केले. 

डीपीडीसी सदस्य महेश नाना साठे, सरपंच संजय साठे यांच्या नेतृत्वाखाली लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायत विविध विकास कामाकरता मोठा निधी खेचून आणला या निधीतून अनेक वर्षापासून ग्रामस्थांची मागणी असलेले प्रवेशद्वार ग्रामपंचायत हद्दीतील विविध नगरात असलेले रस्ते, यमाई तुकाई तलावा नजीक वाहून गेलेल्या भरावाच्या ठिकाणी पूल बांधणे आदी विकास कामाचे दसऱ्याच्या मुहूर्तावर विधान परिषदेचे माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या हस्ते तसेच सरपंच संजय साठे, जिल्हा परिषद सदस्य रामदास ढोणे,उपसरपंच सागर सोनवणे व ग्रामपंचायत सदस्य यांच्या उपस्थितीत भूमिपूजन करण्यात आले. 

यावेळी बोलताना माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी सरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्यांच्या कामाचे कौतुक करत लक्ष्मी टाकळीत होत असलेल्या कामांसाठी विविध योजनांमधून निधी उपलब्ध करून विकास होत आहे. शहरालगत असणारे सर्वात मोठे उपनगर म्हणून याकडे पाहिले जाते आज या भागातील व येथील रहिवाशांची मागणी सरपंच संजय साठे त्यांचे सहकारी यांनी पूर्ण केली असल्याचे सांगितले.

यावेळी बोलताना सरपंच संजय साठे म्हणाले की गेल्या ७० वर्षापासून लक्ष्मी टाकळीला प्रवेशद्वार नव्हते जसे घराला उंबरा असतो हा उंबरा शुभ मानला जातो त्याचप्रमाणे गावाला प्रवेशद्वार असावे ही संकल्पना अनेक दिवसापासून ची आज दसऱ्याच्या मुहूर्तावर पूर्ण होत आहे.लक्ष्मी टाकळी साठी हा ऐतिहासिक दिवस आहे. तसेच गेल्या पंचवीस वर्षात वार्ड क्रमांक तीन मधील शिवपार्वती नगर, संभाजी नगर, महात्मा फुले नगर या भागात रस्त्याचे रखडलेल्या कामालाही आज सुरुवात होत आहे. २५ लक्ष निधी या रस्त्यासाठी उपलब्ध करून आणला त्यामुळे येथील रहिवाशांची अनेक वर्षांची प्रतीक्षा आज मूर्त रूप घेत आहे. तर २५ लक्ष निधी यमाई तलावात नजीक वाहून गेलेल्या भरावाच्या ठिकाणी मजबूत पूल बांधण्यात येणार आहे. 

लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायतीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , माजी आ. प्रशांत परिचारक तसेच जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य  महेश साठे यांची कृपादृष्टी व सहकार्य लाभले आहे. यामुळेच या ग्रामपंचायतीला कोट्यावधी रुपयांचा निधी मिळाला. या निधीतून अनेक विकास कामांना सुरुवात करण्यात आली. निधी उपलब्ध करण्यासाठी अनेक वेळा अडचणी निर्माण होत असतात परंतु आपले डीपीडीसी सदस्य महेश नाना साठे यांच्या कोट्यातून पहिल्या वेळेस पावणे दोन कोटी रुपये मिळाले तर आता साडेतीन कोट रुपये मिळाले आहेत. नाविन्यपूर्ण योजनेतून पाच कोटी रुपये मिळाले तसेच तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून ५० लक्ष रुपये मिळाले अशा अनेक विकास निधीतून सध्या कामे सुरू आहेत. आज दसऱ्याच्या मुहूर्तावर विविध विकास कामाचे भूमिपूजन होत असून या ठिकाणी होणारा रस्ता पुढील २० वर्षात खचणार नाही त्याच्यावर पाणी साठणार नाही अशी ग्वाही सरपंच संजय साठे यांनी उपस्थित नागरिक व येथील रहिवाशांना दिली.

याप्रसंगी सरपंच संजय साठे, उपसरपंच सागर भैय्या सोनवणे, माजी सरपंच नंदकुमार वाघमारे, ग्रामपंचायत सदस्य नागरबाई साठे, आशाबाई देवकते, औदुंबर ढोणे, रोहिणी साठे, रेश्मा साठे, रूपालीताई कारंडे, माजी सरपंच विजयमाला वाळके, माजी उपसरपंच  महादेव पवार, ग्रामविकास अधिकारी जयंत खंडागळे, आबासाहेब पवार, विकास देवकते, भारत जाधव, महादेव काशीद, विठ्ठल ढोणे, नाना मोरे, बंडू थोपटे, सागर कारंडे, रोहन बचुटे, सौरभ नागटिळक, विनायक वरपे, सोनू चव्हाण, बापू उकिरंडे, गणेश ढोणे, अंकुश ढोणे ,अनिल सोनवणे, सविता पवार मॅडम, सुनीता जाधव, प्रियंका कवडे, उषा घाडगे, काजल खरे , सचिन वाळके, सलीम भाई बोहरी, श्याम तापडिया, बाळ कुंभार, नकाते सर तसेच टाकळी ग्रामपंचायतीमधील सर्व आजी-माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि जेष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दसऱ्याच्या मुहूर्तावर लक्ष्मी टाकळीच्या विकास कामातून सरपंच संजय साठे यांचे सीमोल्लंघन
 लक्ष्मी टाकळी प्रवेशद्वाराने ७० वर्षापासूनचे दिवास्वप्न पूर्ण;प्रशांत परिचारकांनी ही केले कौतुक
Reactions

Post a Comment

0 Comments