राणी निलेश लंके यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला
महाविकास आघाडीच्या वतीने पारनेर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्षाच्या अधिकृत उमेदवार राणी निलेश लंके यांनी खासदार निलेश लंके यांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. खासदार निलेश लंके यांनी आमदार म्हणून पारनेर मतदारसंघात केलेले विकासपर्व पुढे घेऊन जाण्यासाठी 'तुतारी वाजवणारा माणूस' या चिन्हासमोरील बटण दाबून पारनेरमधील जनता राणी लंके यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करतील, असा विश्वास व्यक्त केला. याप्रसंगी महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते आदी उपस्थित होते.
0 Comments