Hot Posts

6/recent/ticker-posts

मी भाजपाकडून निवडणूक लढवणार-आ.राऊत यांनी केली भूमिका स्पष्ट

 मी भाजपाकडून निवडणूक लढवणार-आ.राऊत यांनी केली भूमिका स्पष्ट


बार्शी (कटूसत्य वृत्त):- बार्शीचे अपक्ष आ.अगामी विधानसभा निवडणूक ही भारतीय जनता पक्षाकडून लढवणार असल्याची स्पष्ट भूमिका आ. राजेंद्र राऊत यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केली.यावेळी बोलताना आ. राऊत म्हणाले, माझ्या काही सहकाऱ्यांची मी अपक्ष निवडणूक लढवावी, अशी भूमिका होती. बार्शी तालुक्याच्या विकासासाठी पूर्वी कधी एवढा निधी आला होता का? असा सवाल उपस्थित करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांसाठी साठवण तलाव, रस्ते, समांतर पाणी पुरवठा योजना, एमआयडीसी सबस्टेशन,पाणी पुरवठा, वैराग पाणीपुरवठा योजनांसह विविध योजनेतून हजारो कोटींचा निधी दिल्याने शहरासह संपूर्ण तालुक्याचा सर्वांगिण विकास होत आहे.मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जेष्ठ नागरिकांसाठीच्या योजना आणि एवढं जर भरभरून भाजपाने माझ्या तालुक्याकरता सर्वसामान्य जनतेसाठी काम केल असेल तर माझं तर आद्य कर्तव्य आहे की ज्या भाजपा पक्षाने सहकार्य केलं त्या पक्षाकडून उभारणार असल्याचा निर्णय मी दिला आहे. पुढील एक वर्षाच्या आत ५० हजार एकर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे,याची मला खात्री आहे. जो चांगलं काम करतय त्याच्याच पाठीमागं राहणं ही आपलं काम आहे. मी कधी चुकीच्या दिशेने वाटचाल करत नसतो. माझी तालुक्यातील जनतेला विनंती आहे की जर आपल्याला भाजपाने या सरकारने भरभरुन दिलं असेल तर आपणही सगळ्यांनी त्यांच्या पाठीशी राहवं,असे ते म्हणाले.


Reactions

Post a Comment

0 Comments