नरखेड (कटूसत्य वृत्त):- मराठवाड्यातील तत्कालीन ५ व आत्ताचे ८ जिल्ह्यांना हैदराबाद गॅझेट प्रमाणे कुणबी प्रमाणपत्राबाबत न्याय मिळेल,अशी माहिती आ.यशवंत माने यांनी दिली.महाराष्ट्र शासन हैद्राबाद गॅझेट प्रमाणे मराठवाड्यात (तत्कालीन हैद्राबाद स्टेट) कुणी प्रमाणपत्र लाभ देणार असून सोलापूर मधील ५८ गावांत त्यावेळी (१९०९) च्या गॅझेटमध्ये मराठा कुणबी लोकसंख्या असल्याची नोंद आहे. मागील आठवड्यात उपमुख्यमंत्री अजित पवार हे जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने मोहोळ दौऱ्यावर आले असता महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष राजन पाटील व लोकनेते शुगरचे चेअरमन बाळराजे पाटील यांनी सकल मराठा समाजाचे समन्वयक पंडित धवण यांची यासंदर्भात भेट घडवून विषय मांडला होता. त्यावेळीपासून या विषयाला गती होती. मराठवाड्यास हैद्राबाद गॅझेट लागू होणार या बातम्या येऊ लागल्याने सदर विषयी मंत्रालय स्तरापर्यंत नेऊन सामाजिक न्याय विभाग न्यायमूर्ती शिंदे समिती कार्यालय येथे बैठक घेऊन सदर विषयावर सविस्तर चर्चा करून ५८ गावे मराठवाड्यातील असून त्यांच्यावर कोणताही अन्याय होऊ नये ही भूमिका घेतली. त्यावर मार्ग निघून अन्याय होणार नाही, अशी माहिती आ.माने यांनी दिली.
0 Comments