जनतेच्या आशीर्वाद व विश्वासावरच मैदानात उतरलो:
ज्येष्ठ नेते नागनाथ भाऊ क्षीरसागर
मोहोळ (कटूसत्य वृत्त):- मोहोळ तालुक्यातील जनतेचे आशीर्वाद व विश्वासावरच आपण अपक्ष म्हणून अर्ज दाखल केल्याची प्रतिक्रिया नागनाथ भाऊ क्षीरसागर यांनी दिली आहे. आज २९ ऑक्टोबर रोजी मोहोळ तहसील कार्यालय येथे समर्थकासह अपक्ष अर्ज दाखल केला आहे.
नागनाथ भाऊ क्षीरसागर यांनी पंढरपूर लोकसभा मतदारसंघातून दोन वेळा निवडणूक लढवली तर मोहोळ विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा निवडणूक लढवली आहे. नागनाथ भाऊ यांना मानणारा मोहोळ मतदारसंघांमध्ये मोठा वर्ग आहे. मोहोळ विधानसभा मतदारसंघातून क्षीरसागर कुटुंबीयांना तुतारी कडून उमेदवारी न मिळाल्यामुळे खास कार्यकर्त्याच्या आग्रहास्तव नागनाथ भाऊ ही निवडणूक लढवत आहेत.
जनतेचे प्रेम, आशीर्वाद आणि विश्वासावर आपण मैदानात उतरलो आहोत. हीच मायबाप जनता जनसेवेची संधी देईल हा ठाम विश्वास आहे.
0 Comments