Hot Posts

6/recent/ticker-posts

दक्षिण सोलापूर विधानसभेसाठी माजी आमदार दिलीप माने यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल

 दक्षिण सोलापूर विधानसभेसाठी माजी आमदार दिलीप माने यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल 


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज करण्यासाठी आज शेवटचा दिवस असून उमेदवारी अर्ज सादर करण्याची लगबग सुरू झाली आहे. महाविकास आघाडी तसेच महायुतीकडून जवळपास सगळ्याच उमेदवारांनी अर्ज सादर केले आहेत.सोलापूर दक्षिण मतदारसंघातून दिलीप माने यांनी आज अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

त्यांना काँग्रेसने एबी फॉर्म न दिल्यामुळे माने यांना हा निर्णय घ्यावा लागला. दुपारी तीनपर्यंत त्यांनी काँग्रेसच्या या फॉर्मची वाट पाहिली. मात्र याची पूर्तता न झाल्याने शेवटी माने यांना अपक्ष म्हणून उभे राहावे लागले. यानंतर दिलीप माने यांनी अत्यंत संतप्त प्रतिक्रिया दिली. मला एबी फॉर्म न दिल्यामुळे मी अपक्ष म्हणून उभा राहिलो आहे. यात माझे नुकसान झाले नसून काँग्रेस पक्षाचे नुकसान झाले आहे. या राजकीय घडामोडीमुळे महाराष्ट्र काँग्रेस नेतृत्वाचे नुकसान झाल्याची प्रतिक्रिया माने यांनी दिली

Reactions

Post a Comment

0 Comments