शिक्षकांनी केलेल्या भरीव योगदानामुळेच भारताची आजची पिढी समृद्ध
अॅड. मिहीर प्रभूदेसाई; दत्ताअण्णा सुरवसे अमृतमहोत्सव
व्याख्यानमाला...
प्रभूदेसाई म्हणाले, शिक्षकांनी केलेल्या भरीव योगदानामुळेच भारताची आजची पिढी समृद्ध झाली आहे. प्रलय और निर्माण शिक्षक की गोद में खिलते है हे कवींनी मांडलेले मत सत्य आहे. सध्याच्या काळातील शिक्षणाचे बाजारीकरण ही विद्यार्थी घडवण्याची चुकीची पद्धत बदलण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. यावेळी दत्ताअण्णा सुरवसे व प्रभा सुरवसे या दांपत्याचा सत्कार संस्थेच्या वतीने करण्यात आला. तसेच यावेळी मानवता विकास मंडळ, महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा आदी संस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार झाला.
दत्ता अण्णा सुरवसे यांच्यासारखे दानशूर व्यक्तिमत्व
समाजासाठी देवदूतच आहेत असे प्रतिपादन नरेंद्र काटीकर यांनी केले. या कार्यक्रमास राजकुमार सुरवसे, मनीष सुरवसे, राखी सुरवसे, वैशाली सुरवसे, विजय सुरवसे, श्वेता सुरवसे, रवींद्र नाशिककर, डॉ. नासीमा पठाण, हेमा चिंचोळकर, डॉ. श्रीकांतयेळेगावकर पी.पी. कुलकर्णी, पद्माकर कुलकर्णी, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष तानाजी माने, शिक्षण विस्तार अधिकारी बापूसाहेब जमादार यांच्यासह शिक्षण क्षेत्रातील गणमान्यांची उपस्थिती होती. प्राचार्या उज्वला साळुंखे यांनी प्रास्ताविक केले.शुभांगी सगर यांनी आभार मानले
0 Comments