माळशिरस नगरपंचायत कर निर्धारण अधिकारी विकास पवार अँटी करप्शनच्या जाळ्यात…
माळशिरस (कटूसत्य वृत्त):- माळशिरस नगर पंचायतीचे कर निर्धारण अधिकारी विकास गोरख पवार (वय ३८), दीड हजार रुपये लाच घेताना अँटी करप्शनच्या जाळ्यात अडकले.
हकीगत अशी की, बिनशेती जागेची नोंद घेऊन त्यांना मालमत्ता उतारा देण्यासाठी विकास गोरख पवार कर निर्धारण अधिकारी, माळशिरस नगरपंचायत माळशिरस, यांनी शासकीय फी व घरपट्टी व्यतिरिक्त दीड हजार रुपयांची मागणी करून सदरची रक्कम त्यांच्या कार्यालयात स्वीकारल्या वरून भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा कलम ७ प्रमाणे माळशिरस पोलीस स्टेशन सोलापूर ग्रामीण येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक लाच प्रतिबंधक विभाग पुणे शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. शितल जानवे खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा पथकाचे प्रमुख लाच लुचपत प्रतिबंधक सोलापूर विभागाचे पोलीस उपअधीक्षक कुंभार, पोलीस अंमलदार, सहाय्यक पोलीस फौजदार कोळी, पोलीस हवालदार सोनवणे, पोलीस हवालदार घुगे, चालक पोलीस हेडकॉन्स्टेबल गायकवाड यांच्या पथकाने ही कार्यवाही केलेली आहे.
0 Comments