पंढरपूर विधानसभा मतदार संघासाठी मतदान अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण
पंढरपूर (कटूसत्य वृत्त):- 252 पंढरपूर विधानसभा मतदार संघात निवडणुकीसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचारी यांना निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्यात आल्याची माहिती 252 पंढरपूर विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे यांनी दिली.
विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने दाते मंगल कार्यालय, पंढरपूर व लोटस इग्लिश मिडीयम स्कुल, पंढरपूर येथे निवडणुक नियुक्त 1 हजार 185 अधिकारी कर्मचारी यांना प्रथम प्रशिक्षण देण्यात आले. नियुक्त अधिकारी कर्मचाऱ्यांना मतदान प्रक्रियेच्या अनुषंगाने निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे दृकश्राव्य पद्धतीने चलत चित्रफितीद्वारे माहिती देण्यात आली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मदन जाधव यांनी मार्गदर्शन केले
निवडणूक प्रक्रिया पार पाडताना कोणतीही चूक होऊ नये यासाठी अधिकारी व कर्मचारी यांना निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या मार्गदर्शक सूचना प्रमाणे तीन टप्प्यात प्रशिक्षण देण्यात येत असून पहिले प्रशिक्षण आज रविवार दिनांक 27 ऑक्टोबर 2024 रोजी देण्यात आले. तसेच दि. 28 ऑक्टोबर 2024 रोजी ही नियुक्त निवडणूक अधिकारी कर्मचारी यांना दोन सत्रात प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
मतदानाची प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व मतदान कर्मचाऱ्यांनी करावयाच्या कार्यवाहीबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच मतदान कर्मचाऱ्यांना ईव्हीएम मशीन हाताळनीचे प्रत्यक्षद्वारे प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी प्राधान्याने करावयाच्या अनिवार्य बाबी, मतदान यंत्रे हाताळणी बाबत असलेल्या तांत्रिक बाबी, मतदानाच्या दिवशी मतदान प्रक्रिया पार पाडत असताना सर्व यंत्रे सुरळीतपणे कार्यान्वित आहेत किंवा नाही याची खातर जमा करणे याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.
मतदान प्रक्रिया दरम्यान अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी असे आवाहन यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी जाधव यांनी केले.
0 Comments