सोनाई व रूक्माईच्या गरबा स्पर्धेत समर्थ महिला मंडळ प्रथम
अभिनेत्री अमिता कुलकर्णी,गीतांजली गणगेंची हजेरी
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- जुळे सोलापुरातील सोनाई फाऊंडेशन, रूक्माई प्रतिष्ठान आणि समर्थ इलेक्ट्रॉनिक यांच्यावतीने घेण्यात आलेल्या गरबा नृत्य स्पर्धेत समर्थ महिला मंडळ यंदा प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले. विजेत्या समर्थ महिला मंडळाला सिनेअभिनेत्री अमिता कुलकर्णी आणि गीतांजली गणगे यांच्या हस्ते वॉशिंग मशीन भेट देण्यात आले.जुळे सोलापुरातील या स्पर्धा पार पडल्या. यावेळी टाकळीकर मंगल कार्यालयात सोनाईचे संस्थापक अध्यक्ष युवराज राठोड, रूक्माईचे सचिन चव्हाण, राहुल अनंतपूर,प्रमोद पवार, ज्योतीताई अलकुंटे,वैशाली शहापूरे, शाम दुरी, शिंदे गट सेनेचे उपजिल्हाप्रमुख अण्णप्पा सतूबर, चव्हाण, माळप्पा गणियार, अशोक भोपळे, अनिल चव्हाण, अकबर शेख, अशिष बिराजदार,चंद्रकांत शहापूरे, मनोज अलकुंटे, चित्रा कदम, किरण चव्हाण, प्रदीप सुरवसे, राहुल अनंतपुर, प्रमोद पवार, ज्योतीताई अलकुंटे, वैशाली शहापूरे, आदींची उपस्थिती होती.युवराज राठोड म्हणाले की, आमच्या महिला भगिनींच्या अंगातील सुप्त कलागुणांना देण्यासाठी गरबा नृत्य स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेत महिलांचा प्रतिसाद मिळालेला आहे. भविष्यात देखील सामान्य नागरिक आणि विद्यार्थ्यांना वाव देण्याचे काम करण्यात येणार आहे. अभिनेत्री अमिता कुलकर्णी म्हणाल्या की, सोलापूर सारख्या ठिकाणी महिलांना एक व्यासपीठ मिळवून देण्याचे काम सोनाई आणि रूक्माई फाऊंडेशनकडून केल्यानेच संधी मिळाली आहे.
0 Comments