सोलापूरच्या लाडक्या बहिणींनी; फसवणूक करणाऱ्या सरकारचा निषेध करीत माघारी पाठविल्या रिकाम्या बसेस
नरखेड (कटूसत्य वृत्त):- मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सोलापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' वचनपूर्ती कार्यक्रमास जी बस पाठवली होती ती बस गावातील लाडक्या बहिणींनी लाडका भाऊ संघर्ष योद्धा मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून देगाव वा. ( ता. मोहोळ) येथून सर्व गावकरी बांधवांनी रिकामी पाठवून सरकारचा निषेध व्यक्त केला आहे.मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी गावातील सर्व समाज बांधवांनी मराठा समाजाला पाठिंबा म्हणून सर्व जातीधर्माचे बांधवांनी मोठ्या संख्येने लाडकी बहीण कार्यक्रमावर बहिष्कार घातला आहे. देगांव तसेच वाळूज व भैरेवाडी गावातील महिलांनी ही यामध्ये सहभाग घेतला. त्यांनी देखील सरकारचा निषेध व्यक्त केला. जो पर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत कुठल्याही पक्षाच्या कार्यक्रमाला जाणार नाही हा निर्धार केला.यावेळी ग्रामपंचायत सदस्य अमर आतकरे, चांगदेव आतकरे, शंकर भोसले, तेजस आतकरे, दाजी काळे व ग्रामस्थ उपस्थित होते.
0 Comments