Hot Posts

6/recent/ticker-posts

लोकं समाधानी राहतील अशी कामे करा ;खासदार मोहिते पाटील

 लोकं समाधानी राहतील अशी कामे करा ; खासदार मोहिते पाटील 

लऊळ -शिराळ रस्त्याच्या कामाचा शुभारंभ 

लऊळ (कटूसत्य वृत्त):- रस्त्याचे काम करत असताना शेतकऱ्यांना पूर्वकल्पना देऊन काम सुरू करा.ज्या शेतकऱ्यांना पाईपलाईन क्रॉसिंग करायच्या असतील किंवा भविष्यात करायच्या असतील तर पाईप टाकून ठेवावेत जेणेकरून रस्त्याचे आयुष्य जास्त राहील याबरोबरच रस्त्याची कामे दर्जेदार करा जेणेकरून लोकं समाधानी राहतील याची काळजी घ्या अशा सूचना माढा लोकसभेचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. प्रधानमंत्री सडक योजनेतून लऊळ -शिराळ या रस्त्यास 3कोटी 78लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे या रस्त्याच्या उदघाट्न प्रसंगी ते बोलत होते.यावेळी लऊळ ग्रामस्थांनी विविध तक्रारी व समस्या मांडल्या त्या सर्व समस्यांचे समाधान लवकरात लवकर करण्याचे आश्वासन खासदार मोहिते पाटील यांनी दिले.याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ( शरदचंद्र पवार गट ) तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटील,शिवाजी कांबळे,संजय बाबा कोकाटे,राष्ट्रवादी युवा जिल्हा सरचिटणीस विष्णू नलवडे,उपसरपंच चंद्रकांत गवळी,भारत नलवडे,शिराळचे सरपंच सुरेश गुरव,सुदर्शन टोणपे,माजी सरपंच तात्यासाहेब गोडगे,भारत पाटील, पोपट अनवट आनंद टोणपे,दिनेश कांबळे,विजयसिंह पाटील,कार्यकारी अभियंता परदेशी, उपअभियंता जाधव, कनिष्ठ अभियंता घाडगे, ग्रामविकास अधिकारी विजयकुमार माढेकर, सतीश भोंग, बापूसाहेब गायकवाड पोलीस पाटील चंद्रकांत लोकरे, विशाल गायकवाड,प्रकाश चोपडे,हनुमंत देवकर, मुकुंद नलवडे, मारुती नलवडे यांच्यासह लऊळ व शिराळ ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



आमदार बबनराव शिंदे यांची कार्यक्रमाला पाठ नागरिकात रंगल्या राजकीय चर्चा....


सदरील रस्त्याच्या उदघाट्न पत्रिकेत कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माढा विधानसभेचे विद्यमान आमदार बबनराव शिंदे यांचे नाव होते. पण ऐनवेळी ते न आल्याने आमदार समर्थक कार्यकर्त्यांनी तिथून काढता पाय घेतला. यामुळे उपस्थितात शिंदे व मोहिते पाटील यांच्या राजकीय विरोधाच्या चर्चेला उधाण आल्याचे चित्र होते.



 मी तुम्ही निवडून दिलेला खासदार 

सर्व रस्त्यांची कामे व्यवस्थित करू....


 पक्ष्याच्या कामासाठी ज्यावेळी मी जिल्ह्यातून फिरत होतो त्यावेळी विशेषतः माढा मतदार संघातील रस्त्यांची अवस्था अतिशय खराब आहे. रस्त्याचं अस्तित्वच शिल्लक राहिले नाही मी तुम्ही निवडून दिलेला खासदार आहे त्यामुळे जास्तीत जास्त निधी आणून आपण मिळून रस्ते व्यवस्थित करू असे आश्वासन खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी यावेळी दिले.


Reactions

Post a Comment

0 Comments