नातेपुते येथील महाविद्यालयात सखी सावित्री लैंगिक छळ प्रतिबंधक समुपदेशन उपक्रम

नातेपुते (कटूसत्य वृत्त):- नातेपुते येथील सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील महाविद्यालयात सखी सावित्री व लैंगिक छळ प्रतिबंधक समिती अंतर्गत कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना समुपदेशन उपक्रम राबविण्यात आला. याप्रसंगी नातेपुते पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक अमित भगत साहेब यांनी मुला- मुलींना सुरक्षिततेविषयी व निकोप व समता मुलक वातावरण निर्मितीसाठी बहुमोल असे मार्गदर्शन केले. त्याप्रसंगी पोलीस कॉन्स्टेबल मोनिका बोंदर उपस्थित होत्या.कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रज्जाक शेख यांनी मुलींनी आई-वडिलांचे संस्कार आचारनात आणावेत आणि स्वसंरक्षणासाठी मुलींना कराटे प्रशिक्षण व स्वसंरक्षणाचे चे महत्व सांगितले.या कार्यक्रमास प्रा. हसन मोगल, प्रा राजेंद्र साठे, प्रा अजित भोपळे प्रा.सचिन पवार ,प्रा.सचिन माळी हे उपस्थित होते. कनिष्ठ विभागातील कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापिका रब्बाना शेख (मोगल) यांनी केले. सूत्रसंचालन प्राध्यापिका पुष्पा सस्ते यांनी केले.
तर आभार प्रदर्शन प्रा. बापूराव वाघमोडे यांनी केले. शिक्षकेतर कर्मचारी नागराज करपे, नितीन जगताप, ज्ञानेश्वर बोराटे, विलास जावीर, काळे लक्ष्मी , मुलाणी यांनी विशेष सहकार्य केले.
0 Comments