Hot Posts

6/recent/ticker-posts

छत्री दुरुस्ती ! ठरतेय कटुंबाचा आधार; बबन गोसावी यांची ४० वर्षे दीर्घ सेवा

 छत्री दुरुस्ती !  ठरतेय कटुंबाचा आधार

 राधानगरी परिसराला बबन गोसावी यांची ४० वर्षे दीर्घ सेवा 

कुडूत्री (कटूसत्य वृत्त):- छत्री दुरुस्त....... ! अशी आरोळी कानावर आली की, अडगळीत पडलेल्या मोडक्या - तोडक्या छत्र्या  घराघरातून आपसूकच दुरुस्ती साठी बाहेर येतात. अशा ना-दुरुस्त छत्र्या पुन्हा पावसापासून संरक्षण करण्यासाठी जिवंत होतात. अशा छत्र्या दुरुस्त करण्याचे काम गेल्या ४०  वर्षांपासून  वडील शंकर गोसावी यांच्या नतंर बबन गोसावी यांनी ही अनमोल सेवा अजुनही राधानगरी परिसरात जपली आहे.व पोटासाठी गावोगावी एक केविलवाणी धडपड सुरू आहे.

           जीवन जगत असताना मनुष्य आपापल्या व्यवसायानुसार  उत्तम सेवा देत असतो.अशीच सेवा पावसाळा हंगामात  छत्र्या दुरुस्तीची सेवा फिरून बबन गोसावी देतात.मूळ गाव निपाणी येथून  त्यांच्या वडीलापासून  ४० वर्षांपासून स्थायिक झालेले कुटुंब राधानगरी येथे साईनगर येथे वास्तव्य करते. सुरवातीच्या काळापासून भंगार गोळा करणे  तसेच फुगे विक्री व्यवसायातून आपली गुजराण करत असत.राधानगरी परिसरात घराघरात लागणाऱ्या वस्तूही ते देतात. हा फिरता व्यवसाय कुटुंबाने राधानगरी परिसर, वाडी वस्त्या, कुडूत्री,सोन्याची शिरोली,पिरळ, पडळी  तसेच राधानगरी बाजार आदी गावात ही सेवा देत आहेत.एक छत्री दुरुस्तीसाठी ५० च्या वर दर आकारला जातो.आणि मिळेल त्या पैस्यात कटुंबाची गुजराण चालते. सध्या त्यांच्या कुटुंबात चार व्यक्ती वास्तव्य करत आहेत.

   

अवघ्या काही वेळातच छत्री दुरुस्त ......!

     छत्री दुरुस्तीचा वडिलांचा हा  व्यवसाय पहातच  बबन गोसावी यांनी छत्री दुरुस्तीचे ज्ञान अवगत केले आहे. मोडकळीस आलेल्या छत्रीला बघता बघता जीवंत रूप देतात.अजूनही हे काम प्रामाणिक पणे सुरू आहेत.

Reactions

Post a Comment

0 Comments