Hot Posts

6/recent/ticker-posts

ग्रामस्थांच्या आंदोलनानंतर माढेश्वरीचा पालखीमार्ग अखेर दोन दिवसांच्या आंदोलनानंतर खुला

 ग्रामस्थांच्या आंदोलनानंतर माढेश्वरीचा पालखीमार्ग अखेर दोन दिवसांच्या आंदोलनानंतर खुला 

हसीलदार विनोद रणवरेची मध्यस्थी ठरली यशस्वी 


माढा (कटूसत्य वृत्त):- माढा नगरपंचायत हद्दीतील मणकर्णा ओढ्यातून जाणारा अतिक्रमण झालेला माढेश्वरी देवीच्या पालखीचा मार्ग माढ्यातील नागरिक -शेतकर्याच्या रेट्यामुळे अखेर खुला करण्यात आला.
शिवसेना शिंदे गटाचे नेते शंभु साठे यांच्या नेतृत्वाखाली शेतकर्यानी दोन दिवस शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात  ठिय्या आंदोलन केले होते.आंदोलनाच्या दुसर्या दिवशी शेतकरी नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेत मनकर्णा ओढ्यातील पाण्यात उतरुन आंदोलनाचा इशारा देऊन ओढ्याच्या शेजारीच शेतकरी ठिय्या धरुन बसले होते.
शेतकरी आंदोलकांचा पवित्रा पाहुन  नगरपंचायत प्रशासनाकडुन तातडीने हा मार्ग माढ्याचे तहसीलदार विनोद रणवरे,नगर अभियंता गणेश बागल,सपोनि नेताजी बंडगर या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अतिक्रमित पालखी मार्ग जेसीबी च्या सहाय्याने खुला करण्यात आला.यावेळी आंदोलक आंनदुन गेल्याचे पहायला मिळाले.
पालखी मार्ग खुला करणे व वार्ड क्रमांक पाच मध्ये सिमेंट रस्ता करण्याबाबत नगरपंचायतीला निवेदन दिले होते. मंगळवार पासुन  माढ्यात छत्रपती शिवाजी महाराज चौकात या मागणीसाठी ठिय्या आंदोलन करण्यात आले होते.
ठिय्या आंदोलनानंतरही नगरपंचायत प्रशासनाने मागणीची दखल न घेतल्याच्या संतापातुन मणकर्णा नदीपात्रात आंदोलकांनी जलसमाधी घेण्याचा इशारा देताच प्रशासनाची धावपळ उडाल्याचे पहायला मिळाले.
पालखीमार्गावर टाकलेला मुरुमाचा ढिगारा जेसीबीच्या सहाय्याने हटवल्यानंतर हा मार्ग खुला करण्यात आला. यापुढे या ठिकाणी कसलेही  अतिक्रमण होणार नसल्याचे बांधकाम अभियंता गणेश बागल यांनी बोलताना सांगितले.
या आंदोलनात शंभू  साठे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे तालुका उपाध्यक्ष आबासाहेब साठे, शहराध्यक्ष जितेंद्र जमदाडे, शंकर साठे, दिलीप जाधव, रामभाऊ भांगे, तानाजी माने, श्रीकृष्ण डुचाळ, रामलिंग देवकर, सयाजी माने, दिलीप माळी, जालिंदर राऊत, गौतम शिंदे वैभव देवकर, बालाजी खेडकर, सौदागर राऊत सहभागी झाले होते.

जेसीबीसाठी प्रतिक्षा...कोतवाल ठरला भारी-
मनकर्णा नदी पात्राच्या शेजारी आक्रमक पवित्र्यात आंदोलक बसले होते.तहसीलदार विनोद रणवरे,पोलिस निरीक्षक नेताजी बंडगर,बांधकाम अभियंता गणेश बागल यांच्या उपस्थितीत रस्ता मोकळा करण्याचा निर्णय झाला.गणेश बागल सह सर्वच मंडळी  जेसीबीच्या जवळपास पाऊण तास  प्रतिक्षेत होते.
आंदोलक,व अधिकारी मंडळी ताटकळत बसले होते.अखेर कोतवाल किशोर ढावरे तिथे आले आणी अवघ्या १० मिनीटातच जेसीबी मागवला.त्यामुळे या ठिकाणी अधिकार्यापेक्षा कोतवालच भारी ठरल्याचे पहायला मिळाले.

तहसीलदारांची आस्था तर मुख्याधिकाऱ्यांची अनास्था-
तहसीलदार विनोद रणवरे यांनी पालखी मार्गावर स्वतः जात आंदोलकांच्या मागणीबाबतची वस्तुस्थिती पडताळून पाहत जेसीबी बोलावून रस्ता खुला केला. सपोनि बंडगर हे ही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून स्वतः उपस्थित होते. नगरपंचायतीचे मुख्याधिकारी राठोड हे बैठकीसाठी पुणे येथे गेल्याचे सांगण्यात आले.मुख्याधिकाऱ्यांनी आंदोलकांना साधी भेट अथवा फोन वरुन संपर्क देखील साधला  नाही. त्यामुळे त्यांचे कार्यपद्धतीवर संताप व्यक्त करण्यात येत होता.सिओ राठोड यांच्या कामकाजावर काय कारवाई होणार हे पहावे लागणार  आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments