दुबई येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय ग्लोबल विमा परिषदेत दीपक जगताप करणार भारताचे प्रतिनिधित्व
माढा (कटूसत्य वृत्त):-उपळाई (खुर्द) ता. माढा येथील आणि सोलापूर जिल्ह्यातील एकमेव कॉर्पोरेट क्लब सदस्यता मेंबर असलेले व गेल्या चार वर्षापासून सतत विमा व्यवसायातील आंतरराष्ट्रीय दर्जाचा सोलापूर जिल्ह्यातून सलग सीओटी (Court of the table) चे सदस्य असणारे एलआयसी विमा प्रतिनिधी दीपक महादेव जगताप हे दुबई येथे होणाऱ्या भारतीय आयुर्विमा महामंडळ एल.आय.सी कडून आंतरराष्ट्रीय ग्लोबल विमा परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
माढा तालुक्यातील उपळाई (खुर्द) या ग्रामीण भागातील दीपक जगताप यांनी जिद्दीच्या जोरावर आणि मनगटाच्या बळावर विमा क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर पुन्हा एकदा भरारी घेतली आहे...त्यांना एम. डी.आर.टी (USA) हा बहुमान सलग 23 वेळा मिळवला आहे.
दुंबई येथे होणार्या आंतराष्ट्रीय परिषदेसाठी
निवड झाल्याबद्दल दीपक जगताप यांचे अभिनंदन केले जात आहे.
0 Comments