लोकमंगल कृषीजैवतंत्रज्ञान महाविद्यालयात जैविककिटनाशके संशोधन व कृषी जैवतंत्रज्ञानातील संधी याविषयी मार्गदर्शनपर व्याख्यान संपन्न
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- श्रीराम ग्रामीण संशोधन व विकास प्रतिष्ठान संचलित लोकमंगल कृषीजैवतंत्रज्ञान महाविद्यालयात जैविककिटनाशके संशोधन व कृषी जैवतंत्रज्ञानातील संधी याविषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान अॉनलॉईन पद्धतीने आयोजित करण्यात आले होते या व्याख्यानास प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी रविंद्र कांबळे (संशोधक, बडोदा अॅग्रोकेमिकल लिमिटेड गुजरात) हे लाभले होते. प्रमुख पाहुणे मा. रविंद्र कांबळे यांनी विद्यार्थ्यांना किटकनाशके व त्यांचे विविध प्रकार व त्यांचा कृषी क्षेत्रात वापर कशा प्रकारे केला जातो याविषयी मार्गदर्शन केले. यामध्ये त्यांनी विद्यार्थ्यांना प्रामुख्याने जैविक किटकनाशके, त्यांचे विविध प्रकार, जैविक किटकनाशकांच्या उत्पादनासाठी वापरण्यात येणारे विविध सुक्ष्मजीवाणू व त्यांची निवड व त्यांचा वापर करून जैविककिटकनाशके उत्पादन प्रक्रिया, सुक्षमजीवाणूंची कार्यक्षमता वाढवणे, उत्पादित झालेल्या जैविककिटकनाशकांची गुणवत्ता तपासणी, साठवणूक व विक्री याविषयावर सखोल असे मार्गदर्शन केले.
यासोबतच त्यांनी विद्यार्थ्यांना संशोधक म्हणून विविध राष्ट्रीय संशोधन केंद्र व कृषी विद्यापीठातील संशोधन क्षेत्रातील संधी, महाराष्ट्र कृषी विभागाच्या विविध संधी विविध कृषी कंपन्यांतील संशोधन संधी याविषयी मार्गदर्शन केले. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर त्यांच्याशी चर्चा करुन आपल्या शंकाचे निरसन करून घेतले. या कार्यक्रमाचे समन्वयन व सुत्रसंचालन प्रा सागर महाजन यांनी केले. या कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य प्रदीप आदलिंगे, प्रा सागर महाजन, प्रा. आशिष सरकाळे, प्रा. वर्षा मानेदेशमुख, प्रा. मंजुश्री डोंगरे, प्रा. सचिन जाधव तसेच महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
0 Comments