०३ वर्षाच्या बालकाचे अपहण करणा-या आरोपीस घेतले ताब्यात
स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण यांची कामगिरी
कोल्हापूर (कटूसत्य वृत्त):-मौजे साजणी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर येथील ०३ वर्षाच्या बालकाचे अपहण करणा-या आरोपीस स्था. गु.शा. सोलापूर ग्रामीणच्या पथकाने बालकास व आरोपीस घेतले ताब्यात
यातील फिर्यादी हे मुळचे ओरिसा राज्यातील राहणारे असून नवमहाराष्ट्र सुतगिरणी कंपनी हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर येथे सुतगिरणी कामगार म्हणून कामास असून तेथेच राहणेस आहेत. दिनांक २५/०८/२०२४ रोजी ०८:३० वा. च्या सुमारास यातील फिर्यादीचा मुलगा ( वय ०३ वर्षे ) यास शेजारील राहणारा इसम संजय कुमार मलिक याने मुलास कोठेतरी फिरविण्यासाठी घेवून गेला होता, परंतु बराच वेळ झाल्यानंतर संजय मलिक याने मुलगा ( वय ०३ वर्षे ) यास घरी परत घेवून आला नाही फिर्यादीची पत्नी घरी आल्यानंतर तिला सांगितले की मुलगा ( वय ०३ वर्षे ) यास शेजारी राहणारा संजय मलिक याने घेवून गेला असल्याचे सांगितलेत्र फिर्यादीच्या पत्नीने आरोपी संजय मलिक यास फोन केला असता थोडया वेळात येतो असे सांगून उडवाउडवीचे उत्तरे देत होता. त्सायंकाळी १६:०० वा. पर्यंत संजय मलिक हा मुलास परत घेवून आला नसल्याने यातील फिर्यादी याचा संशय वाढलयाने घाबरून हातकणंगले पोलीस ठाणे जिल्हा कोल्हापूर येथे फिर्याद दिल्याने गुरनं ४६९/२०२४ बी. एन.एस २०२३ चे कलम १३७ प्रमाणे दिनांक २५/०८/२०२४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हयाचे गांभीर्य ओळखून हातकणंगले पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांनी फिर्यादी व तिच्या पत्नीकडे अधिक माहिती घेतली असता, यातील संशयित इसम हा मुलासह सोलापूर येथून रेल्वेने ओरिसा येथे जाणार असल्याची त्यांना प्राथमिक माहिती मिळाली. त्यानंतर पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांनी सोलापूर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांना सदरची माहिती दिली. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांनी तात्काळ सपोनि विजय शिंदे व त्यांचे पथक सोलापूर रेल्वे स्थानक येथे जावून संशयित इसम व मुलाचा सोलापूर रेल्वे स्थानक परिसरात कसोसीने शोध घेणेबाबत मार्गदर्शनपर सुचना देवून रवाना केले. त्याप्रमाणे सपोनि विजय शिंदे व त्यांचे पथक रेल्वेस्टेशनच्या परिसरात संशयित इसमाचा व मुलाचा शोध घेत असताना ते दोघेही मिळून आले. त्यानंतर मुलास व संशयित आरोपीस पुढील कारवाई करीता हातकणंगले पोलीस ठाणे यांचे ताब्यात दिले आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, मा. अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांचे नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहा. पोलीस निरीक्षक विजय शिंदे, सफौ नारायण गोलेकर, पोहेकॉ / ३८७ धनाजी गाडे, पोहेकॉ / ८५३ मोहन मनसावाले, पोकॉ/ सागर ढोरे-पाटील, महिला पोना / दिपाली जाधव यांनी बजावली आहे.
0 Comments