Hot Posts

6/recent/ticker-posts

मनोरमा मल्टिस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी लि.,सोलापूर ची १३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात सभासदांना १२ टक्के लाभांश जाहीर

 मनोरमा मल्टिस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी लि.,सोलापूर ची  १३ वी 

वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात

सभासदांना १२ टक्के लाभांश जाहीर


सोलापूर  (कटूसत्य वृत्त):-मनोरमा मल्टिस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी लि.,सोलापूर ची  १३  वी वार्षिक सर्वसाधारण सभा बेन्नूर नगर येथील मुख्य कार्यालयातील मनोरमा भवनात दि. २५/०८/२०२४ रविवारी सकाळी उत्साहात पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी चेअरमन सौ. शिल्पा महेंद्र कुलकर्णी  होते. 

व्यासपीठावर मनोरमा परिवाराचे मार्गदर्शक  श्रीकांत मोरे, मनोरमा सखी मंचच्या अध्यक्षा सौ. शोभा मोरे, व्हा. चेअरमन कमलाकर  पुजारी, संचालक अजय रमेश मोरे,  डॉ. ऋचा मोरे, प्रशांत शहापूरकर,  अतुल कुलकर्णी  , उत्तरेश्वर जाधव, शहाजी भोसले, मोहन गायकवाड, प्रियदर्शनी बेनगी, सीईओ सौ.कविता कुलकर्णी आदी उपस्थित होते.

प्रारंभी ज्येष्ठ सभासदांच्या हस्ते दीप्रप्रज्वलन करून सभेस सुरुवात करण्यात आली. यावेळी चेअरमन सौ. शिल्पा महेंद्र कुलकर्णी  यांनी संस्थेच्या अहवाल सालातील आर्थिक प्रगतीचा आलेख मांडला. संस्थेचे वसूल भागभांडवल २०.८५  कोटी असून राखीव व इतर निधी ११.२५ कोटी आहे. ठेवी ४७८.५० कोटी असून कर्जे ३८५.११कोटी आहे. एकूण गुंतवणूक २६४.६९ कोटी असून मिश्र व्यवसाय आजपर्यंत ८६३.६१  कोटी झाल्याचे सांगून सभासदांना दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी १२ टक्के लाभांश देत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांना समर्पक उत्तरे चेअरमन सौ. शिल्पा महेंद्र कुलकर्णी  यांनी दिली. तसेच सभासदांनी केलेल्या सूचनांची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन दिले. यावेळी अहवालाचे वाचन चेअरमन सौ.  शिल्पा कुलकर्णी, व्हा. चेअरमन कमलाकर  पुजारी, संचालक अजय मोरे व  सीईओ सौ. कविता  कुलकर्णी  यांनी केले.

मनोरमा सखी मंचच्या अध्यक्षा सौ. शोभाताई मोरे व मनोरमा परिवाराचे मार्गदर्शक  श्रीकांतजी मारे यांनी वार्षीक सर्वसाधारण सभेत सर्व सभासदांनी मोठया प्रमाणात उपस्थीती राहिल्याबददल समाधान व्यक्त केले व मनोरमा मल्टिस्टेट मधील कामकाज आणि विश्वासार्हता या विषयी माहिती दिली तसेच मनोरमा मल्टिस्टेटच्या उन्नतीसाठी अर्थपुर्ण सहकार्याचे आवाहन केले.   

यावेळी संचालक मंडळासह सभासद, खातेदार, अधिकारी, कर्मचारी, मनोरमा परिवारातील सदस्य उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments