Hot Posts

6/recent/ticker-posts

खवणीच्या उपसरपंचपदी प्रा. खिलारे

 खवणीच्या उपसरपंचपदी प्रा. खिलारे

मोहोळ(कटूसत्य वृत्त):- येथील ग्रामपंचायतीच्या रिक्त झालेल्या उपसरपंच पदावर प्रा. सतीश खिलारे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची उपसरपंचपदी विनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी घोषित केले. खवणी ग्रामपंचायतीवर शिवछत्रपती ग्रामविकास आघाडीची सत्ता असून या ग्रामपंचायतीचे सरपंचपद हे महिला प्रवर्गासाठी राखीव असल्याने शीतलताई यमगर या विद्यमान सरपंच आहेत. उपसरपंचपदावर काम करण्यासाठी महिलांना संधी मिळावी म्हणून यापूर्वी सिंधूताई वोवडे, रेखा भोसले, सुरेखा भोसले यांना प्रत्येकी एक वर्षासाठी उपसरपंचपदाची संधी दिली होती. तसेच येणाऱ्या दोन वर्षांसाठी उपसरपंच म्हणून काम करण्याची संधी प्रा. सतीश खिलारे यांना देण्यात आली आहे. खिलारे हे अनुसूचित जाती प्रवर्गातून प्रतिनिधित्व करत आहेत.

यावेळी भाजप अ.जा. मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष संजीव खिलारे, प्रा. अजितसिंह भोसले, तेजस वोवडे, ग्रामसेवक सोमनाथ सोनवणे, महादेव यमगर, किसन भोसले, तेजस खिलारे

Reactions

Post a Comment

0 Comments