बदलापूर येथील आरोपीला ताबडतोब फाशीची शिक्षा देण्यात यावी
पिलीव (कटूसत्य वृत्त):-माळशिरस तालुक्यातील पिलीव येथे बदलापूर येथील शाळेतील चिमुरड्यांवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ सत्ताधारी व प्रशासनाच्या विरोधात कॅन्डल मार्चचे आयोजन करण्यात आले.
पिलीव येथील हनुमान मंदिरापासून मार्चची सुरुवात झाली तर शेवट पोलीस ठाण्याला निवेदन देऊन करण्यात आला. यावेळी पक्षीय मतभेद विसरून नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यामध्ये मनसेच्या नगरसेविका रेश्मा टेळे, मनसेचे तालुकाध्यक्ष सुरेश टेळे, तालुका संघटक मायाप्पा जावळे, अनंता जामदार, शिवसेना तालुका उपाध्यक्ष डॉ. निलेश कांबळे, आरिफखान पठाण, श्याम मदने, नितीन कपने, अविनाश जेऊरकर, फिरोज शेख, अतुल जामदार, अमोल मदने, मोहसीन शेख, रणधीर जामदार, राजाभाऊ जामदार, अमिनखान पठाण, सचिन पुकळे, कदीरखान पठाण आदी उपस्थित होते.
यावेळी या घटनेतील आरोपीला ताबडतोब फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली.
0 Comments