शिवाजी महाराजांचा पुतळा कामातील भ्रष्टाचारामुळे कोसळला
- अॅड. मीनल साठे
माढा (कटूसत्य वृत्त):-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यामुळे काँग्रेसच्या कार्यकत्यांनी माढ्यात केंद्र आणि राज्य सरकारचा निषेध केला.
यावेळी बोलताना माढ्याच्या नगराध्यक्षा अॅड. मीनल साठे यांनी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील ४ डिसेंबर २०२३ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले होते. मात्र, अवघ्या ८ महिन्यात हा पुतळा कोसळला. या कामातील भ्रष्टाचारामुळे हा पुतळा कोसळला असल्याचा आरोप करत हा महाराजांचा अवमान आहे, असे सांगितले.
या घटनेच्या निषेधार्थ काँग्रेसच सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व माढा शहरातील नागरिकांनी मंगळवारी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे एकत्र येऊन निषेध व्यक्त केला.
0 Comments