Hot Posts

6/recent/ticker-posts

उजनीतून भीमा नदीत ९० हजार क्युसेक विसर्ग धरणाची पाणीपातळी कुठे?

 उजनीतून भीमा नदीत ९० हजार क्युसेक विसर्ग धरणाची पाणीपातळी कुठे?

टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):-भीमा खोऱ्यात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे दौंड येथील वाढ झाली असून, उजनीतून भीमा नदीत सोडण्यात येणाऱ्या विसर्गात १० हजार क्युसेकने वाढ करण्यात आली आहे.उजनीतून गेल्या तीन दिवसांपासून ८० हजार क्युसेक विसर्ग भीमा नदीत सुरू होता.दौंड येथील विसर्गात वाढ होत गेल्याने दुपारी २:३० वाजेचा सुमारास आणखी वाढ करून ९० हजार क्युसेक करण्यात आला आहे.
दौंड येथून बुधवारी सायंकाळी ७७ हजार ७५५ क्युसेक विसर्ग उजनी धरणात मिसळत आहे. उजनी धरणाचीपाणी पातळी स्थीर ठेवण्यासाठी उजनीतून मोठ्या प्रमाणात विसर्ग सोडण्यात येत आहे.सध्या उजनी धरणाची पाणी पातळी १०७.६२ टक्के यावर ठेवण्यात आली आहे, तर १२१.३२ टीएमसी पाणीसाठा असून, उपयुक्त पाणीसाठा ५७.६६ टीएमसी आहे. ९ जूनपासून दौंड विसर्ग सातत्याने कमी अधिक प्रमाणात चालू आहे.सध्या उजनीतून मुख्य कालवा १ हजार ६०० क्युसेक, भीमा-सीना जोड कालवा २००, सीना-माढा उपसा सिंचन योजना १७५, तर दहीगाव ८० क्युसेक विसर्ग शेतीसाठी सोडण्यात येत आहे. वीजनिर्मितीसाठी १ हजार ६०० क्युसेक विसर्ग सोडण्यात येत आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments