मुख्यमंत्री यांनी क्षणाचाही विलंब न करता राजीनामा द्यावा- संजय कोकाटे
टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):- नौदलाने उभारलेले महाराष्ट्राचे आराध्य दैवत मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा जेमतेम आठ महिन्यांपूर्वी अनावरण झालेला पुतळा कोसळला.या घटनेचा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक करून,सरकारच्या विरोधात निदर्शने व घोषणाबाजी करून शेलक्या शब्दात निषेध करण्यात आला.
यावेळी करमाळा चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर महाविकास आघाडी व सामाजिक संघटनांच्या वतीने निदर्शने करण्यात आली.एकच प्रायश्चित घ्यावे,मुख्यमंत्री यांनी क्षणाचाही विलंब न करता राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे संजय कोकाटे यांनी केली तर
या वेळी संजय घाटणेकर म्हणाले की .बोगस कामे करणाऱ्या व कमिशन खाऊ,ठेकेदारी सरकार वरती जोरदार ताशेरे ओढलत निषेध केला तर शिवसेनेचे टेंभुर्णी शहरात प्रमुख सुरेश लोंढे म्हणाले की सरकार प्रसिद्धी श्रोताच्या नादी लागलेले सरकार आहे अशा सरकारने राजीनामा द्यावा तर राष्ट्रवादी माढा तालुका अध्यक्ष औदुंबर महाडिक -देशमुख म्हणाले की आशा अपयशी सरकारला शिवप्रेमी माफ करणार नाही लवकरच चारी मुंड्या वर पाय केल्या शिवाय राहणार नाही या वेळी संभाजी ब्रिगेड चे जिल्हा अध्यक्ष सचिन जगताप यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारणाऱ्या कंत्राटदार व संबंधित अधिकारी यांच्यावर तातडीने कारवाई करा अन्यथा संभाजी ब्रिगेड महाराष्ट्रभर आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही अशा शब्दात यावेळी निषेध व्यक्त केला
या वेळी राष्ट्रवादी चे संजय कोकाटे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष औदुंबर (भाऊ) महाडिक -देशमुख,आकोले चे नेते भारत नाना पाटील, संजय पाटील-घाटनेकर, संभाजी ब्रिगेड चे जिल्हा अध्यक्ष सचिन जगताप, राष्ट्रवादी चे ॲड बाळासाहेब पाटील वरवडे,युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संजय पाटील, टेंभुर्णी शिवसेना शहर प्रमुख सुरेश भाऊ लोंढे, सापटणे टें चे दत्तात्रेय ढवळे, सामाजिक कार्यकर्ते गोरख बप्पा देशमुख, टेंभुर्णी चे माजी उसरपंच बलभीम आप्पा लोंढे, टेंभुर्णी ग्रामपंचायत सदस्य परमेश्वर खरात, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मयूर काळे, जनशक्ती संघटनेचे विठ्ठल आबा मस्के, टेंभुर्णी ग्रामपंचायत सदस्य सुधीर पाटील, शिवसेनेचे उप शहर प्रमुख संतोष खैरमोडे, प्रशांत सोनवणे, संभाजी ब्रिगेड चे तालुका संघटक नितीन मुळे, गट प्रमुख दादा देशमुख, शहर अध्यक्ष सचिन खुळे, सतिश चांदगुडे, चेअरमन विलास देशमुख,
सामाजिक कार्यकर्ते भीमराव बंडगर, व्यापारी संघटनेचे पपेश पाटील,तेजस निंबाळकर,संदीप कुटे,दत्ता खडके, आझाद फाऊंडेशन चे शहर अध्यक्ष अजीज शेख,भैय्या शेख,भारत नवले,बाबा महाडिक,योगेश महाडिक,दामोदर लामकाने,पांडुरंग महाडिक,सचिन देशमुख,मिटु देशमुख,जयवंत कोळपे,योगेश साळुंके,सुदर्शन गायकवाड,गजानन गायकवाड,विठ्ठल साळुंके,संजय टाकतोडे,तुकाराम पाटील,पिंटू पाटील,सचिन जाधव यांच्यासह विविध पक्ष,सामाजिक संघटनांचे पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments