Hot Posts

6/recent/ticker-posts

शाळेत साप पकडायला गेले साप मिळाला नाही पण सर्प प्रबोधन करून आले.....

 शाळेत साप पकडायला गेले साप मिळाला नाही पण सर्प प्रबोधन करून आले.....

सोलापूर : आशा नगर एम.आय.डी. सी येथील मौनेश्वर मराठी विद्यालय येथे साप दिसला असल्याचा फोन प्रणिमित्र सुनिल अरळीकट्टी यांना आला..वेळेचा विलंब न करता सुनिल  अरळीकट्टी तसेच नागसेन शिवशरण घटनास्थळी दाखल झाले. सगळीकडे शोधा शोध केली पण साप दिसून आला नाही.शाळेच्या मुख्याध्यापिका आशाराणी डोके मॅडम यांनी त्यांच्या मोबाईल मध्ये त्या सापाचे फोटो दाखवले.फोटो पाहून प्राणिमित्रानी त्यांना सांगितलं की हा बिनविषारी गावत्या जातीचे साप आहे.शाळेतील विद्यार्थी घाबरल्याने मुख्याध्यापिका आशाराणी डोके मॅडम यांनी शाळेतील विद्यार्थ्यांचे सर्प प्रबोधन करण्यास प्राणिमित्राना सांगितले.

 सर्व विद्यार्थ्यास शाळे समोरील प्रांगणात बसवून त्यांना सर्व आवश्यक माहिती देण्यात आली. विषारी साप, बिनविषारी साप यांचे फोटो सर्व विद्यार्थ्यांना दाखवण्यात आले. सर्प बद्दल सर्व गैरसमज तसेच अंधश्रद्धा याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले.सर्व विदयार्थ्यांनी माहिती व्यवस्थित ऐकून घेऊन त्यांच्या मनातील सर्व प्रश्न यांची उत्तरे प्राणिमित्रानी देऊन त्यांच्या मनातील भीती दूर करण्याचा प्रयत्न केला.

या प्रसंगी प्रशालेच्या मुख्याध्यापिका आशाराणी डोके मॅडम, महात्मा गांधी मेमोरियल हायस्कुल मुख्याध्यापक बगले सर तसेच विशेष सहकार्य म्हणून विजयकुमार नवले,गुरुशांत दादा धुत्तरगावकर, बसवराज जमखंडी तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर, विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. कार्यक्रमचे आभार मुख्याध्यापिका डोके मॅडम यांनी करून प्रणिमित्र सुनिल  अरळीकट्टी तसेच नागसेन शिवशरण यांचा सत्कार करून व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.कागदे सर यांनी केले.

Reactions

Post a Comment

0 Comments