विधानसभेत मुस्लिम समाजाला किमान १५% उम्मेदवारी देण्याची मागणी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, August 31, 2024

विधानसभेत मुस्लिम समाजाला किमान १५% उम्मेदवारी देण्याची मागणी

विधानसभेत मुस्लिम समाजाला किमान १५% उम्मेदवारी देण्याची मागणी 

सेक्युलरवादी मुस्लिम फ्रंटची सर्व पक्षांसोबत सकारत्मक चर्चा सुरु

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सर्व पक्षीयप्रमुख नेत्यांना मुस्लिम समाजाच्या राजकीय प्रतिनिधित्वाच्या मुद्द्यावर सेक्युलरवादी मुस्लिम फ्रंटने औपचारिक पत्र पाठवले होते, त्याबाबत सकारत्मक चर्चा सुरु आहे. या पत्रात, मुस्लिम समाजाच्या 15% जनसंख्येच्या टक्केवारीनुसार विधानसभेच्या जागांची मागणी करण्यात आलेली होती. सेक्युलरवादी मुस्लिम फ्रंट हे सर्व पक्षीय मुस्लिम समाज प्रतिनिधींच्या एकत्रित समाजव्यासपीठ म्हणून ही मागणी स्वरूपात राज्यभर यात्रा घेऊन जात असून, वाढत असलेला पाठिंबा सर्वत्र राजकीय चर्चेचा विषय झाला आहे. असे ॲड मोहम्मद अफरोज मुल्ला यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

अलीकडे पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत मुस्लिम समाजाने महाविकास आघाडीला एकसंध समर्थन दिले होते, ज्यामुळे आघाडीला विजय प्राप्त झाला. तरीही, सध्याच्या परिस्थितीत मुस्लिम समाजाचे राजकीय प्रतिनिधित्व शून्यगणिक आहे. विधान परिषदेत एकही सदस्य नाही, आणि लोकसभा मतदारसंघात देखील प्रतिनिधित्व नाही. मुस्लिम समाज महाराष्ट्रातील 65 विधानसभेच्या मतदारसंघांत निर्णायक ठरतो, तरीही त्यांच्या प्रतिनिधित्वाची अवस्था चिंताजनक आहे, या समस्येवर उपाय म्हणून, सेक्युलरवादी मुस्लिम फ्रंट आगामी विधानसभा निवडणुकीसाठी एक व्यापक यात्रा झाली आहे. यात्रा 30 ऑगस्ट 2024 रोजी शाहू स्मारक, कोल्हापूरयेथून सुरू झाली, 31 ऑगस्ट रोजी सोलापूर येथे येणार आहे, आणि पुढील ठिकाणी जाईल 1 सप्टेंबर: लातूर, 2 सप्टेंबर: उस्मानाबाद, 3 सप्टेंबरनांदेड, 4 सप्टेंबर:यवतमाळ, 5 सप्टेंबर: अमरावती, 6 सप्टेंबर:अकोला, 7 सप्टेंबर:बुलढाणा.

या यात्रेद्वारे, मुस्लिम समाजाच्या प्रतिनिधित्वाच्या मुद्द्यावर व्यापक चर्चा जाणारअसून, सर्व राजकीय पक्षांना मुस्लिम समाजाच्या लोकसंख्येच्या टक्केवारीनुसार 15% उमेदवारी देण्याची मागणी अधिक बाळकटीने समाज म्हणून महाराष्ट्रा च्या राजकीय पटला वर आणली जाईल. “मागणीला वाढता पाठिंबा पाहता व सुरु असणाऱ्या सकारात्मक चर्चा पाहता परिणाम स्वरूप समाजाला येणाऱ्या विधानसभे मध्ये जनसंख्या टक्केवारी नुसार १५% उम्मेदवारी मिळून समाजाचे राजकीय प्रतिनिधित्व निश्चित निर्माण होत आहे." असेही यावेळी सांगण्यात आले.

या पत्रकार परिषदेस ॲड मोहम्मद अफरोज मुल्ला, ॲड हजरतअली बडेखान, शरीफ शेख, झाकीर शेख, बंदेनवाज सय्यद आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages