Hot Posts

6/recent/ticker-posts

कोलकाता , बदलापूर अमानवी घटनेने निषेधार्थ तीव्र निदर्शने लाडकी बहिण म्हणताय सुरक्षेचं काय?- नसीमा शेख

 कोलकाता , बदलापूर अमानवी घटनेने निषेधार्थ तीव्र निदर्शने

लाडकी बहिण म्हणताय सुरक्षेचं काय?- नसीमा शेख

सोलापूर (कटूसत्य वृत्त):-आई बहीण पत्नी मुलगी चिमुकली कोण आहे सुरक्षित आहे? बदलापूर येथील अमानवी घटनेने  अत्याचाराचा कळस गाठला आहे.आम्ही कोणावर विश्वास ठेवू?  सरकार एकीकडे राज्य शासन महिलांना सबलीकरण करण्यासाठी लाडकी बहिण योजना लागू केली पण सुरक्षेचं काय असा सवाल संघटनेचे राज्य अध्यक्ष माजी नगरसेविका नसीमा शेख यांनी केला. 

बुधवार दिनांक 21 ऑगस्ट रोजी जिल्हा परिषद पूनम गेट येथे अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या वतीने कोलकाता आणि बदलापूर येथील अमानवी घटनेच्या निषेधार्थ तीव्र निदर्शने ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉ.नरसय्या आडम मास्तर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. 

Save the doctor 

We want justice

चिमुकल्या बालकांवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला पाठीशी घालणाऱ्या शिक्षण संस्थेचा निषेध असो

 NO SEFTY  

NO DUTY

लिंगपिसाट नराधमांना फाशी द्या

नराधमांना पाठीशी घालणाऱ्या ममता बॅनर्जी मुर्दाबाद 

 कोलकाता बदलापूर अमानवी घटनेचा निषेध असो

लाडकी बहिण योजना नको 

सुरक्षित बहीण योजना लागू करा

पीडितांना न्याय देण्यास विलंब का?

 तिचा खून पाडला पण ते जिवंत आहेत

ये राक्षसांनो आणखी किती बळी घेता ?

 लैंगिक अत्याचाराची विकृती 

कधी थांबणार ? गृहमंत्री जवाब दो....

 आई ,बहीण, पत्नी ,मुलगी ,आजी चिमुकली कोण आहेत सुरक्षित ? 

अशा आक्रोश  घोषणांनी परिसर दणाणून गेले. 

यावेळी बोलताना माजी आमदार नरसय्या आडम मास्तर म्हणाले की, या देशात दररोज महिलांवर बलात्कार,अत्याचार होतात याबाबत केंद्र सरकार ची यंत्रणा काय करते? कुचकामी पोलीस प्रशासन काय कामाचे? सरकारच्या दिरंगाई मुळे देशाचे अतोनात नुकसान होत आहे. पीडितांना न्याय मिळत नाही विलंब कशासाठी ? या नराधमांना फाशी का देत नाही?असे अनेक जनतेच्या मनातील प्रश्न उपस्थित करून सरकारला धारेवर धरले. 

यानंतर सिटू चे राज्य महासचिव ॲड.एम.एच.शेख यांनी या घटनेचा निषेध व्यक्त केले. 

यावेळी व्यापीठावर माजी आमदार नरसय्या आडम मास्तर, एम.एच.शेख, युसुफ मेजर , शेवंता देशमुख,सुनंदा बल्ला,फातिमा बेग, ॲड. अनिल वासम, दत्ता चव्हाण,अशोक बल्ला आदींची उपस्थिती होती. 

यावेळी  शकुंतला पाणीभाते , सुनंदा सुर्यवंशी, गंगुबाई कणकी, अफसाना बेग विल्यम ससाणे विक्रम कलबुर्गी,दाऊद शेख, दीपक निकंबे ,बापू साबळे, अकील शेख, किशोर मेहता, बाबू कोकने, नरेश दुगाने, वसीम मुल्ला, कादर शेख, विजय हरसुरे, बाळकृष्ण मल्याळ, वीरेंद्र पद्मा मल्लेशम कारमपुरी, दत्ता हजारे,विश्वनाथ बिराजदार, बजरंग गायकवाड शाम आडम, सनी शेट्टी आदींनी परिश्रम घेतले. 

सूत्रसंचालन ॲड.अनिल वासम यांनी केले तर आभार अफसाना बेग यांनी केले.

Reactions

Post a Comment

0 Comments