Hot Posts

6/recent/ticker-posts

दिवाळीत अन्नपूर्णा नमकीन तर्फे दुबई टूर

 दिवाळीत अन्नपूर्णा नमकीन तर्फे दुबई टूर


सोलापूर (कटूसत्य वृत्त):-सोन्या चांदीचे नाणे मिळवण्याची सुवर्णसंधी रक्षाबंधन ते दिवाळी भाऊबीज पर्यंत खरेदीवर बक्षीस योजना गेल्या 43 वर्षापासून सोलापूर व पुण्यात मिठाई उत्पादन क्षेत्रात नावलौकिक असलेल्या दिवाळीत अन्नपूर्णा नमकीन च्या वतीने रक्षाबंधन ते दिवाळी भाऊबीज पर्यंत खरेदीवर बक्षीसांची आकर्षक योजना राबविण्यात येत आहे यामध्ये लकी ड्रॉ द्वारे दुबई टूर, सोन्या- चांदीचे नाणे मिळवण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. अशी माहिती उत्पादक नंदकिशोर तिवाडी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
 प्रसिद्ध मिठाई उत्पादक व विक्रेते नंदकिशोर तिवाडी हे गेल्या 43 वर्षापासून सोलापुरात तर पुण्यात गेल्या ८ वर्षापासून हा व्यवसाय करीत आहेत त्यांनी पुण्यातील अत्याधुनिक यंत्रसामुग्रीसह कारखान्याची उभारणी केली आहे दरम्यान दिवाळी अन्नपूर्णा नमकीन च्या वतीने रक्षाबंधन ते दिवाळी भाऊबीज पर्यंत मिठाई खरेदी वर भव्य बक्षीस योजना जाहीर केली आहे तिवाडी यांच्या अन्नपूर्णा नमकीन मिठाई नावाने असलेल्या मिठाई नमकीन बेकरी उत्पादनावर ही बक्षीस योजना आहे.

 50 हजार रुपयांची खरेदी केल्यास एक कुपन मिळेल यावर दुबई टूरची दोन बक्षिसे ठेवण्यात आली आहे मुंबई टू दुबई दुबई टू मुंबई असा प्रवास यामध्ये राहणार आहे एका व्यक्तीसाठी तीन दिवस व दोन रात्र यामध्ये विमान प्रवास हॉटेलमधील निवास व तीन दिवस नाष्टा व एक दिवस जेवण अशी सुविधा उपलब्ध राहणार आहे 20000 रुपयांच्या खरेदीवर एक कुपन मिळेल पाच ग्राम वजनाचे सोन्याचे नाणे अशी दोन बक्षीस आहेत तर पाच हजार रुपयांच्या खरेदीवर एक उपाय देण्यात येईल यासाठी 100 बक्षिसे ठेवण्यात आले आहेत यासाठी दहा ग्रॅम वजनाचे चांदीचे नाणे बक्षीस स्वरूपात देण्यात येणार आहे.
 
या योजनेचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर दिलेल्या कुपन मधून साधारणता एक डिसेंबर 2024 रोजी लकी ड्रॉ पद्धतीने सोडत काढण्यात येणार आहे वेगवेगळ्या बक्षिसांची वेगवेगळ्या लकी ड्रॉ सोडती असतील योजनेच्या अटी व शर्ती सर्वस्वी दिवाळी अन्नपूर्णा यांच्या असून त्यांनी घेतलेला निर्णय बंधनकारक राहणार आहे यावर कुठेही तक्रार चा करता येणार नाही तेव्हा सर्व ग्राहकांनी या बक्षीस योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन नंदकिशोर तिवाडी यांनी केले आहे.

या पत्रकार परिषदेस शैलेश बजाज सचिन खानापुरे व संतोष उदगिरी आदी उपस्थित होते.
Reactions

Post a Comment

0 Comments