राज्यपालांनी सरकार बरखास्त करावे - अजय दासरी
मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामे द्यावे
शिक्षणसंस्था व दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी
सोलापूर(कटूसत्यवृत्त):-बदलापूर घटनेच्या निषेधार्थ व राज्य सरकारच्या विरोधात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने जिल्हा परिषद पुनम गेट येथे बुधवारी तीव्र निदर्शने करण्यात आली. राज्य सरकार बरखास्त करावे, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी राजीनामे द्यावेत. राज्यपालांनी त्वरित सरकार बरखास्त करावे अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाध्यक्ष अजय दासरी यांनी आंदोलनावेळी केली.
बदलापूर येथील त्या शिक्षण संस्थेवर कठोर कारवाई करण्यात यावी. त्या नराधमावर व दिरंगाई करणाऱ्या शाळेतील हलगर्जीपणा केलिया अधिकारी व कर्मचाऱ्यांवर देखील कठोर कारवाई करण्यात यावी. पिडीत्याला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी उपनेत्या सौ.अस्मिता गायकवाड यांनी केली.
केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार असताना व महाराष्ट्रात मिंदे सरकार आल्यापासूनच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. जे कोणी आरोपी आहेत त्यांना कायद्याची भीती राहिलेली नाही. फास्टट्रॅक कोर्टात खटला चालवून नराधमाला फाशी देण्यात यावी मागणी दत्तात्रय पंत वानकर यांनी केली.
यावेळी उपनेत्या सौ अस्मिता गायकवाड,उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण, दत्तात्रय गणेशकर, शहरप्रमुख दत्तात्रय पंत वानकर, उपश प्रमुख लहू गायकवाड,आबा सावंत, पूजा खंदारे, सुरेश शिंदे, अनिल जाधव, सुरेश जगताप, ऋषी दोरकर, बाबू दोरकर, विजय पुकाळे,सोमनाथ बंदपट्टे, कृष्णा सुरवसे, अमोल भोसले, बाळासाहेब पवार, दत्ता खलाटी, शशिकांत बिराजदार, डॉ.शकील आतार, ज्योतीबा गुंड, सुरेश जगताप, संदिप बेळमकर, अमीत भोसले, अनिल दंडगुले, धनराज जानकर,जगदीश मुल्ला आदी शिवसेना, महिलाआघाडी, युवा युवतीसेना व सर्व अंगीकृत संघटना आजी माजी पदाधिकारी, शिवसैनिक मोठ्यासंख्येने उपस्थित होते.
अशा नराधमांना भर चौकात फाशी द्या
बाळासाहेब ठाकरे यांनी यापूर्वी सुद्धा म्हटलेले आहे की अशा बलात्कारी लोकांना भर चौकात फाशी देण्यात यावी याच अनुषंगाने फास्टट्रॅक कोर्टात केस न चालवता व एसआयटीने नेमका अशांना भर चौकात फाशी देण्यात यावी.
-उपजिल्हा प्रमुख प्रताप चव्हाण
0 Comments