Hot Posts

6/recent/ticker-posts

ओबीसी सेलच्या जिल्हाध्यक्षपदी अरुण तोडकर

 ओबीसी सेलच्या जिल्हाध्यक्षपदी  अरुण तोडकर


सोलापूर(कटूसत्य वृत्त):- जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अरुण तोडकर यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या ओबीसी सेलच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

अरुण तोडकर यांनी गेली पाच वर्षे म्हाळुंग जिल्हा परिषद गटाचे सदस्य म्हणून काम पाहिले आहे. जिल्हा नियोजन समितीचेही ते सदस्य होते. जिल्ह्यातील अनेक प्रश्नांवर त्यांची आक्रमक भूमिका दिसून आली. नुकत्याच झालेल्या

लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवाराच्या प्रचारासाठी त्यांनी हिरारीने काम केले. या कामाची पावती म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष राज राजापूरकर यांनी तोडकर यांची सोलापूर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.

Reactions

Post a Comment

0 Comments