मागील दहा वर्षापासून जनतेच्या विकासासाठी
विरोधकांनी काय कामे केले - बाळराजे पाटील
मोहोळ (कटूसत्य वृत्त):- डिकसळ येथे माजी आमदार राजन पाटील यांच्या मार्गदर्शनातून - आमदार यशवंत माने यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या विविध विकास कामांचे भूमिपूजन सोमवारी लोकनेते कारखान्याचे चेअरमन • बाळराजे पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते हनुमंत पोटरे होते. यावेळी बाळराजे पाटील म्हणाले लोकनेते बाबूराव अण्णा पाटील यांच्या विचाराचा वारसा घेऊन विकासात्मक दृष्टिकोनातून आम्ही वाटचाल करत आहोत. मागील दहा वर्षापासून जनतेच्या विकासासाठी विरोधकांनी काय कामे केले.
यावेळी गोविंद पाटील, राजकुमार पाटील, बालाजी साठे, शशिकांत पाटील, सरपंच बळीराम गुरव आदी उपस्थित होते.
0 Comments