Hot Posts

6/recent/ticker-posts

तालुक्यातील सर्व गावांच्या विकासासाठी कटीबद्ध राहू - बाळराजे पाटील

 तालुक्यातील सर्व गावांच्या विकासासाठी कटीबद्ध राहू - बाळराजे पाटील 

नरखेड (कटूसत्य वृत्त):- लोकनेते बाबुराव अण्णा पाटील यांनी घालून दिलेल्या संस्कारावर आम्ही राजकारण करीत आहोत. यापूर्वीच्या तालुक्याच्या राजकारणात कै. शहाजीराव पाटील, कै. संभाजीराव गरड, एआरडी शेख यांनी कधी कोणत्याही विरोधकांवर व्यक्तिगत टीका केली नाही. सध्या तालुक्यात कोणतेही राजकीय अस्तित्व नसलेली विरोधी मंडळी केवळ स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी व्यक्तिगत टीका करत आहेत. मात्र लोकनेते परिवार व जनतेची नाळ कायम घट्ट असून यापुढील काळातही जनतेच्या पाठीशी खंबीर उभा राहून तालुक्यातील सर्व गावांच्या विकासासाठी कटीबद्ध राहू. निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या जीवावर आम्ही राजकारण करीत असल्याचे प्रतिपादन लोकनेते शुगरचे चेअरमन बाळराजे पाटील यांनी केले.

मोहोळ तालुक्यातील डिकसळ येथे माजी आमदार राजन पाटील यांच्या मार्गदर्शनातून व आमदार यशवंत माने यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या विविध विकास कामांच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी ते बोलत होते.

या कार्यक्रमास हणमंत पोटरे, गोविंद पाटील, राजकुमार पाटील, बालाजी साठे, शशिकांत पाटील, सरपंच बळीराम गुरव, भाऊसाहेब कोल्हाळ, पंडित ढवण, वसंत धावणे, आबासाहेब धावणे, सुरेश धावणे, सुभाष धावणे, संजय धावणे, अरुण धावणे, यशवंत धावणे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments