शेवगाव पाथर्डी मतदारसंघातून भाजपचे ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष गोकुळ दौंड यांच्या उमेदवारीसाठी तरुण-तरुणींचे देवाला साकडे
पाथर्डी(कटूसत्य वृत्त):- भाजपचे ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष गोकुळ दौंड यांना शेवगाव पाथर्डी मतदारसंघांमधून भाजप पक्षाची उमेदवारी मिळावी म्हणून पाथर्डी तालुक्यातील भालगाव येथील युवा तरुण रोहित खेडकर यांनी सूर्यमुखी मंदिर हडपसर येथे जोपर्यंत गोकुळ भाऊ दौंड आमदार होत नाही तोपर्यंत मी चप्पल घालणार नाही असं दृढ निश्चय केला असून काही युवा तरुणी सुद्धा यामध्ये अग्रेसर सहभाग घेत असून गोकुळ दौंड यांना भाजपची उमेदवारी मिळावी यासाठी सामाजिक कार्यकर्त्या सुरेखाताई केदार यांनीही मोहटादेवी येथे नवस केलेला दिसत आहे गोकुळ दौंड यांचे पाथर्डी मध्ये व तेथील विकास कामांमध्ये प्रचंड मोलाचे योगदान असून गेले पंधरा वर्षे सक्रिय राजकारणामध्ये पाथर्डी शहर व ग्रामीण भागामध्ये आपले वेगळ्या पद्धतीने तरुण-तरुणींमध्ये युवा वर्गामध्ये एक आपल्या कामाच्या माध्यमातून वेगळी छाप सोडण्यात त्यांनी यश प्राप्त केले आहे आपल्या पतीच्या पावलावर ते पाऊल ठेवून पाथर्डी पंचायत समिती च्या सभापती गोकुळ भाऊ दौंड यांच्या पत्नी सुनीता दौंड यांना पाथर्डी मतदारसंघामधून पंचायत समिती वरती प्रचंड मताधिक्याने निवडून येऊन सुनिता दौंड यांनीही विकास कामे करण्यामध्ये मोलाचे योगदान देऊन यशस्वी ठरले आहेत
गोकुळ दौंड यांनी पाथर्डी शहरांमध्ये सर्वसामान्य नागरिकांसाठी नेहमी जनता दरबार भरून जनतेचे विकास कामे मार्गी लावण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत तहसील स्तरावरील सर्व योजना श्रावण बाळ योजना असेल संजय गांधी निराधार योजना असेल किंवा सध्या कार्यरत असलेली लाडकी बहिण योजना असेल सर्वसामान्य नागरिकांचे रेशन कार्ड संदर्भात अडीअडचणी असतील सर्व अडचणी सोडवण्यामध्ये गोकुळ दौंड यांचा मोलाची योगदान लाभलेले दिसून येत आहे याच माध्यमातून तालुक्यातील युवक तरुण-तरुणी आपला नेता आमदार करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या देव-देवतांना नवस व साकडे घालताना दिसत आहे
गोकुळ दौंड यांची विधानसभेची तयारी पाहता शेवगाव पाथर्डी मतदार संघाचे वाटचाल चौरंगी लढतीकडे जाताना दिसत आहे विधान परिषदेच्या आमदार पंकजाताई मुंडे यांचे निष्ठावंत कार्यकर्ते व भाजप पक्षाचे निष्ठावंत म्हणून गोकुळ दौंड यांचा परिचय आहे यापुढील काळात भाजप पक्ष तेथील इच्छुकांबाबत काय निर्णय घेतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे
0 Comments