Hot Posts

6/recent/ticker-posts

५ कोटी ८५ लाख रुपये निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल बाळराजे पाटील यांचा पंचक्रोशीच्या वतीने फेटा बांधून सत्कार

  ५ कोटी ८५ लाख रुपये निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल बाळराजे पाटील यांचा पंचक्रोशीच्या वतीने फेटा बांधून  सत्कार

मोहोळ (कटूसत्य वृत्त):- राजकीय क्षेत्रामध्ये सर्वसामान्यांसाठी कार्यरत राहून विकासाचे प्रश्न मार्गी लावणारेच यशस्वी होत असतात. केवळ राजकीय आकस आणि द्वेष भावनेतून विकासाला आडवे जाणाऱ्या व्यक्तींना सर्वसामान्य जनता ही सहजरीत्या ओळखते. अरबळीसारख्या केवळ सातशे मतांच्या गावाने आजवर राष्ट्रवादीची विचारधारा जपत सातत्याने विकासासोबत राहण्याची भूमिका घेतली  आहे. त्यामुळे या गावासाठी रस्ते आणि अन्य सुविधांसाठी पंधरा कोटीपेक्षा जास्त निधीची विकास कामे पूर्ण होत असल्याची बाब निश्चितपणे या पंचक्रोशीच्या वतीने अभिमानास्पद असल्याचे उद्गार लोकनेते शुगरचे चेअरमन बाळराजे पाटील यांनी काढले.

अरबळी येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन बाळराजे पाटील यांच्या हस्ते पार पडले. याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. अरबळी ग्रामपंचायतीसाठी सामाजिक न्यायमधून काँक्रिटीकरण, पेवर ब्लॉक बसवणे, गावांतर्गत रस्ता करणे, अण्णाभाऊ साठे नगर रस्ता कॉक्रिटीकरण, अंतर्गत गटार या कामांचे यावेळी भूमिपूजन करण्यात आले. अल्पसंख्यांक फंडामधून मुस्लिम दफनभूमी वॉल कंपाऊंड, नमाजपठन शेड, ग्रामपंचायत कार्यालयासाठी निधी नव्याने मंजूर झाला आहे.

यावेळी अस्लम चौधरी, दिलीप पाटील, नवनाथ घाडगे, पोपट जाधव, माणिक सुरवसे, भिमराव पुजारी, विकास पवार, सोमनाथ दावणे, नवनाथ वराडे, पांडुरंग पवार, तानाजी बनसोडे, आबा जगदाळे, सिराज पटेल, शशिकांत वराडे, विनायक चोरगे, चंद्रकांत भोई, दत्ता राऊत इत्यादींसह अरबळी परिसरातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

ग्रामस्थांच्या वतीने सत्कार

ना.अजित पवार यांच्या सहकार्यामुळे आमदार यशवंत माने यांच्या माध्यमातून अरबळी ते इंचगाव रस्ता काँक्रिटीकरणासाठी ६ कोटी १४ लाख, अरबळी ते घोडेश्वर रस्ता काँक्रिटीकरणासाठी ५ कोटी ८५ लाख रुपये निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल यावेळी बाळराजे पाटील यांचा पंचक्रोशीच्या वतीने फेटा बांधून सत्कार करण्यात आला.

Reactions

Post a Comment

0 Comments