लाभक्षेत्रात विद्युत मोटारी काढण्याची लगबगउजनी शंभर टक्के भरल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद
उन्हाळ्यात धरण साठा मायनस ६०% टक्के पर्यंत खाली गेला होता.त्यामुळे विद्युत पंप, पाईप ,केबल व इतर उपकरणाच्या पोटापर्यंत शेतकऱ्यांनी नेऊन जोडली होती. धरण क्षेत्रात होणाऱ्या पावसामुळे नदीच्या पाणी पातळीत प्रचंड वेग असल्याने उजनी लाभ क्षेत्रातील वाशिंबे (ता.करमाळा) येथील शेतकऱ्यांमध्ये विद्युत पंप, पाईप ,केबल, मोटर स्टार्टर काढण्यासाठी धांदल उडालेली आहे.
.पुणे जिल्हा परिसर व धरण क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे नद्यां,नाले, वडे भरून वाहत आहेत हे सर्व पाणी उजनी जलाशयात दाखल होत असल्याने धरणाचा पाण्यासाठी झपाट्याने वाढ होऊन धरण १००% भरले असून, धरणातून मोठ्या प्रमाणात भिमा नदीत पाण्याचा विसर्ग केला जात आहे.पुणे जिल्हा तसेच धरण क्षेत्रात सर्वत्र जोरदार पाऊस बरसात होत असल्याने पुणे जिल्ह्यातील मुळा- मुठा ,पवना तसेच इंद्रायणी नद्या हाऊसफुल्ल होऊन वाहत आहेत. लाभक्षेत्रातील जलाशयाच्या फुगवटा भागातील नदी काठावरील करमाळा, इंदापूर ,कर्जत तालुक्यातील शेतकरी आपल्या विद्युत मोटारी व साहित्य पाण्यापासून दूर करण्यात मग्न आहे.धरण यावर्षी १००% भरल्याचा आनंद शेतकरी वर्गात पाहवयास मिळत आहे.
0 Comments