सुभेदार राजेंद्र नरवडे यांच्या स्वागतासाठी उसळला
देशभक्तीचा अथांग महासागर
शिरूर (कटूसत्य वृत्त):- शिरूर तालुक्यातील छोटेसे गाव खंडाळे नगरीमध्ये माजी सैनिक नायब सुभेदार राजेंद्र संभाजी नरवडे यांच्या सेवानिवृत्तीनतंर पुणे नगर हायवे पासून तब्बल दोन किलोमीटर लांब खंडाळे गावापर्यंत भव्य दिव्य अशी रॅली काढत जेसीबीच्या साह्याने पुष्पवृष्टी करत माजी सैनिकांच्या देशसेवेस खंडाळे ग्रामस्थांनी व देशभक्तांनी अनोखी मानवंदना दिली.
खंडाळे गावच्या हायवेवरील प्रवेशद्वारापासूनच माजी सैनिकांच्या ताब्यासहित रॅलीला मोठ्या उत्साहाच्या व आनंदाच्या वातावरणात असंख्य देशभक्तांच्या हजेरीने सुरुवात झाली होती.खंडाळे गावच्या विषयावरच माजी सैनिकांच्या ताब्याला मानवंदना देण्यासाठी वरून राजाने आज कृपादृष्टी केली होती वरून राजा आज भलतास खुश होता वरून राजाने आपल्या साश्रू नयनांचा जलाभिषेक घालत माजी सैनिकांचे उत्स्फूर्त स्वागत करत अनोखी अशी मानवंदना दिली होती धरणी माता आज जणू काही हिरवा शालू पांघरून माजीसैनिकांच्या देशसेवेस मानवंदना देण्यासाठी उत्स्फूर्त पणे सज्ज होती. गावातील मुख्य चौका चौकात सैनिकांच्या ताफ्याचे पुष्पवृष्टी करत स्वागत करण्यासाठी दिमाखात सज्ज होते
वातावरण भारावून टाकत खंडाळे गावच्या प्रत्येक चौका चौका आणि अथांग अशा जनसागराच्या गर्दीने रस्ते व मुख्य चौक गजबजलेले होते गावातील प्रत्येक मुख्य चौका चौकामध्ये जेसीबीच्या साह्याने होत असलेली पुष्पवृष्टी असंख्य माजी सैनिकांचा ताफ्यांच्या स्वागतासाठी रस्त्यावरती काढलेल्या रांगोळ्या आणि दारी लावलेली तोरणे यामुळे गावामध्ये आज दिवाळी दसरा असल्याचा अनुभव प्रत्येक जण घेत होता
मिरवणूक आजच्या सत्कारमूर्तींच्या घराजवळील चौकात आली असता देशभक्तांच्या साक्षीने जीसीपीच्या साह्याने होत असलेली पुष्पवृष्टी अनेकांचे लक्ष वेधून घेत होती सुभेदार राजेंद्र संभाजी नरवडे यांचे त्यांच्या पत्नी व गावातील माता-भगिनींच्या वतीने औक्षण करत पंचारती ओवाळत मोठ्या उत्साहाच्या व आनंदाच्या वातावरणामध्ये स्वागत करण्यात आले.
ग्रामदैवत रोकडोबा महाराजांच्या मुख्य प्रांगणासमोर विराट अशा स्वागत समारंभ सभेचे आयोजन करण्यात आले होते.माजी सैनिकांच्या ताफ्याचे मंदिरासमोर आगमन होताच फटाक्यांची आतषबाजी व पुष्पवृष्टिकरत सैनिकांना मानवंदना देण्यात आली यानंतर ग्रामदैवत रोकडोबा महाराजांच्या महाआरतीने कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली होती. छत्रपती शिवाजी महाराजांची महाआरती घेऊन शिवगर्जना देत सभेमध्ये देशभक्ती व राष्ट भक्ती प्रेरित केली गेली.
डीजेच्या आवाजातील मंत्रमुग्ध करणारी देशभक्तीपर गीते यांनी वातावरण अक्षरशः भारावून टाकले होते खंडाळे गावातील माजी सैनिकांच्या ताफ्याच्या भव्य दिव्य आशा रॅलीचे थेट प्रक्षेपण ड्रोन द्वारे करण्यात आले होते.शिरूर तालुक्यातील नामवंत शिवव्याख्याते शिवश्री आकाश वडगुले यांनी आपल्या निवेदन शैली, मंत्रमुग्ध करणाऱ्या वाणीतून सैनिक सुभेदार राजेंद्र नरवडे यांची कौटुंबिक परिस्थिती, जीवनपट,सैनिक देशसेवा कार्यकाल,चालू कौटुंबिक वाटचाल कथन करत असताना सैनिक सुभेदार राजेंद्र नरवडे यांच्या कमी वयातच आर्थिक परिस्थिती हालाखीची असणाऱ्या काळातच अल्पशा आजाराने पितृछत्र हरपल्याने संपूर्ण जबाबदारी मातोश्री मुक्ताबाई नरवडे यांच्यावर आल्यानंतर त्यांनी मेजर, रमेश,दिनेश तीन मुलांचे संगोपन तुटपुंज्या शेतीवर करत कुटुंबाचा गाडा सुस्थितीत ठेवला.सैनिक सुभेदार राजेंद्र नरवडे यांचें प्राथमिक शिक्षण खंडाळे गावातच झाले,आठवी दहावी पर्यंतचे शिक्षण रांजणगाव गणपती कोंढापुरी येथे झाले.विद्या विकास मंदिर निमगाव म्हाळुंगी येथे उच्च माध्यमिक कला शाखा विभागात बारावी पर्यंतचे शिक्षण झाले.७ जुलै २००० मध्ये भारतीय सैन्य दलात नियुक्त झाल्यानंतर सैनिकी प्रशिक्षण नाशिक, जबलपूर येथे झाले.पहिली पोस्टींग जम्मु-काश्मिर मध्ये झाली तेथे खडतर धोकादायक परिस्थितीत चार वर्षे देशसेवा केली.त्यानंतर ओरिसा राजस्थान एक वर्ष, कारगिल, सियाचीन (-४०अंश सेल्सिअस तापमान ५ महिने आंघोळ केली नाही). बंगलोर येथे चार वर्षे, तसेच जम्मू काश्मीर,सिक्कीम, राजस्थान,व दिल्ली आदी खडतर दुर्गम भागात अखंडपणे देशसेवा करुन अखेर नायब सुभेदार (MACP) या पदावर सेवानिवृत्त झाले हा देशसेवा कार्यकाल कथित केला.उपस्थित जनसमुदायास अनेक शेरोशायरी देशभक्तीपर गीते आणि घोषणा यांनी वातावरण अक्षरशः देशभक्तीमय व तिरंगामय करत संपूर्ण.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वडघुले यांनी केले.माजी सैनिकांच्या स्वागत समारंभासाठी विविध स्तरातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते त्याचप्रमाणे गावातील सरपंच उपसरपंच व सर्व स्तरातील आजी-माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते हजारोंच्या संख्येने जमलेला जनसमुदाय कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण बिंदू होता उपस्थित सर्व माजी सैनिकांचा येथे असा सन्मान या ठिकाणी करण्यात आला होता या शुभप्रसंगी उपस्थिता मध्ये प्रमुख मान्यवर मध्ये आंबेगाव बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम साहेब,शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शिरूर आंबेगाव अध्यक्ष शेखरदादा पाचुंदकर पाटील,शिरूर आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गटाचे अध्यक्ष मानसिंगभैय्या पाचुंदकर पाटील या आणि असंख्य अनेक नामवंत व्यक्तींनी आपली मनोगत व्यक्त करत देशभक्ती,राष्ट्रभक्ती व्यक्त केली.युवा पिढीला देशसेवेसाठी प्रेरणा, समाजाची देशाविषयी,सैनिका विषयीची भावना सदैव जागृत असावी हे विचार डोळ्यासमोर ठेवून आयोजन -नियोजन मेजर साहेबांचे जिवलग मित्र चांगदेव शेठ नरवडे(अध्यक्ष पाणलोट समिती खंडाळे), बन्धु रमेश नरवडे (अध्यक्ष शा.व्य.स.खंडाळे) व संपूर्ण नरवडे मित्रपरिवार आणि समस्त ग्रामस्थ खंडाळे यांच्या वतीने करण्यात आले होते कार्यक्रमाच्या शेवटी सुभेदार राजेंद्र नरवडे यांचे बंधू व खंडाळे गावचे उत्कृष्ट निवेदक अध्यक्ष रमेश नरवडे यांनी सर्वांचे आभार मानले वंदे मातरम् घेत कार्यक्रमाची सांगता झाली.
0 Comments