ग्रामीण भागातील विद्यार्थीही घवघवीत यश मिळवतात- मनोहर डोंगरे
मोहोळ (कटूसत्य वृत्त):- ग्रामीण भागातील विद्यार्थीही घवघवीत यश मिळवतात मनोहर डोंगरे शेटफळ तालुका मोहोळ या ठिकाणी आज गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला एमपीएससीच्या माध्यमातून आज सोमनाथ बलभीम भांगे या विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल सत्कार व वर्षाराणी सिद्धेश्वर भांगे या विद्यार्थिनीने मर्चंट नेव्ही मरीन इंजिनियर यामध्ये घवघवीत यश मिळवल्याबद्दल व सातारा पोलीस मध्ये सिद्धेश्वर हिंगमिरे या सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल आज सत्कार संपन्न झाला यावेळी बोलताना मनोहर भाऊ डोंगरे म्हणाले की ग्रामीण भागातून ही विद्यार्थी चांगल्या यशापर्यंत जाऊ शकतात बलभीम भांगे यांचे कार्य हे शून्यातून कुटुंबाने केलेली प्रगती सुरुवातीला मोडनिंब मार्केट यार्ड मध्ये कामाला असताना मुलांना शिक्षणासाठी कुठलीही कमतरता पडू न देता त्यांनी एक मुलगा इंजिनियर व दुसरा मुलगा पोलीस उपनिरीक्षक बनविला खरोखरच यांचे कार्य कौतुकास्पद आहे मुलांनी केलेल्या मेहनतीचे यश हे त्यांना मिळतेच व असेच कार्य करत राहू ही सदिच्छा व आपल्या हातूनी मुलांची प्रगती व्हावी ही अपेक्षा यावेळी शेटफळ गावच्या प्रथम नागरिक लक्ष्मी काकू वाग जउपसरपंच दत्तात्रय वागज माजी सरपंच विश्वास आप्पा पुजारी माझी सैनिक संघटनेचे अध्यक्ष एकनाथ दादा वाघच सौदागर नाना भांगे तानाजी बापू वाघज पंकज शहा भगवंत दादा पुजारी रामलिंग भांगे मेजर हनुमंत पाटील शामराव वाघज पप्पू डोंगरे शामकर्ण वागज राजू कोष्टी संभाजी वाघज त्याचबरोबर रमेश डांगे पत्रकार अनिल खडके विष्णू व्यवहारे गणेश माळी दादासाहेब शेंडगे दीपक शेंडगे असे बहुसंख्य ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संभाजी वाघज यांनी केले तर आभार संजय शेळके यांनी मांडले
0 Comments