मराठा-मुस्लिम आरक्षण देत नाही, मुख्यमंत्र्यांचा वर्षा बंगला ताब्यात घेणार, प्रहार आक्रमक
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- मराठा समाजाला आणि मुस्लिम समाजाला आरक्षण मिळत नसल्याच्या निषेधार्थ सगे सोयऱ्याचा कायदा पारित होत नाही त्यासाठी प्रहार पक्षाने आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. मराठा आणि मुस्लिम आरक्षणासाठी आम्ही प्रहारचे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी मुख्यमंत्र्यांचे वर्षा निवासस्थान ताब्यात घेणार आहोत, अशी कठोर भूमिका प्रहारच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी १३ ऑगस्ट पर्यंतचा सरकारला अल्टिमेटम दिला आहे. प्रहार पक्षाचे जिल्हाध्यक्ष दत्ता म्हस्के पाटील यांनी आम्ही अल्टिमेटम देत नाही, कुणालाही पूर्वसूचना न देता मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान ताब्यात घेणार, असा इशारा दिला.
पोलिसांनी समजूत घालत मोर्चा दुसरीकडे वळविला
प्रहार पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या निवासस्थानासमोर मोर्चा आणून थांबविला होता. जिल्हाधिकारी यांच्या निवासस्थानासमोर प्रहारचे शेकडो कार्यकर्ते आणि पदाधिकारी जमल्याने परिसरात तणाव निर्माण झाला होता. सोलापूर पोलिसांनी ताबडतोब मोठा पोलीस फौजफाटा वाढविला आणि मोर्चा दुसऱ्या ठिकाणी मार्गस्थ करण्यासाठी प्रयत्न केले. जवळपास अर्धा तास प्रहारचे कार्यकर्ते व पदाधिकारी जिल्हाधिकारी यांच्या निवासस्थाना समोर थांबले होते. सोलापूर पोलिसांनी समजूत काढत हा मोर्चा पुढे मार्गस्थ केला.
मराठा आणि मुस्लिम आरक्षणासाठी प्रहार आक्रमक
प्रहार जनशक्ती पक्षाचे मराठा आणि मुस्लिम आरक्षणात उडी घेतली आहे. मनोज जरांगे पाटील हे गेल्या वर्षभरापासून आरक्षणासाठी झगडत आहेत. मुस्लिम आरक्षणदेखील प्रलंबित आहे. राज्य सरकार मुस्लिम आणि मराठा समाजाची दिशाभूल करत आहे. त्यामुळे आम्ही मराठा आणि मुस्लिम आरक्षणासाठी रस्त्यावरची लढाई लढणार अशी भूमिका प्रहारने घेतली.
.png)
No comments:
Post a Comment