Hot Posts

6/recent/ticker-posts

परिते येथे खा.निलेश लंके यांनी केली दीड लाख वारकऱ्यांनची जेवणाची सोय

परिते येथे खा.निलेश लंके यांनी केली दीड लाख वारकऱ्यांनची जेवणाची सोय

वारकऱ्यांच्या अडचणी पाहण्यासाठी टेंभुर्णी ते पंढरपूर टू व्हीलर प्रवास करून विचारपुस

          टेंभुर्णी (कटुसत्य वृत्त): नगर जिल्ह्यातून येणाऱ्या सर्व पायी दिंड्या मधील वारकऱ्यांना जेवणाची सोय परिते या गावा जवळ केली होती. सलग तीन दिवसांमध्ये दीड लाख वारकऱ्यांची सेवा स्वतः खास. लंके यांनी केली. प्रत्येक वारकऱ्याला 'कुठून आला तब्येत, बरी आहे का?' विचारपूस करून त्यांना जेवणाची, नाश्त्याची सोय केली होती. 

          तसेच वारकऱ्यांची विचारपूस करण्यासाठी व अडचणी जाणून घेण्यासाठी स्वतः खासदार निलेश लंके टेंभुर्णीतील माजी सरपंच बलभीम लोंढे यांच्या साई सागर हॉटेल मध्ये मुक्कामी होते. त्यांनी स्वतः सलग तीन दिवस परिते येथे ते परिते ते टेंभुर्णी दोन दिवस मोटरसायकलवर ये जा करत होते. टू व्हीलर वर प्रवास करण्यासाठी ते टेंभुर्णी तील सर्वसामान्य कार्यकर्ता प्रमोद कांबळे यांच्या  टू व्हीलर वर ते टेंभुर्णी परिते प्रवास करीत होते. त्यांनी वारकऱ्यांची काळजी घेण्यासाठी परिते ते टेंभुर्णी टू व्हीलर वर प्रवास करून वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी ते पंढरपूर पर्यंत जात होते  सर्वसामान्यांचा खासदार म्हणून ओळख असलेले त्यांनी कुठलाही बंदोबस्त घेतला नाही वारकऱ्यांसोबत गप्पागोष्टी मारण्यात ते गेली तीन दिवस दंग असल्याचे दिसत होते. बहुतांश वारकरी हे नगर बीड येथील असल्याने ते आपल्या भागातील वारकरी असल्याकारणाने सर्वांची काळजी घेत होते.

Reactions

Post a Comment

0 Comments