Hot Posts

6/recent/ticker-posts

शहीद अशोक कामटे संघटनेच्यावतीने एकादशीनिमित्त वृक्षारोपण

शहीद अशोक कामटे संघटनेच्यावतीने एकादशीनिमित्त वृक्षारोपण


           सांगोला (कटुसत्य वृत्त) : शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटनेच्यावतीने आषाढी एकादशीनिमित्त उत्साही भक्तिमय वातावरणात वृक्षारोपण करण्यात आले.

           स्टेशन रोड येथील संघटनेच्या मुख्य कार्यालय पाच झाडांचे वृक्षारोपण व्यापारी सचिन सपाटे व महेश तारळकर यांच्या हस्ते या  वृक्षारोपण, वृक्षवल्ली आम्हा सोयरे , वनचरे या उक्तीप्रमाणे करण्यात आले.

           हरित राज्यासाठी एक वारकरी ,एक झाड अभियान राबवण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही आव्हान केले आहे व सांगोल्यातील आपुलकी प्रतिष्ठानच्या पर्यावरण बचाव उपक्रमास, आव्हानास प्रतिसाद देत संघटनेचे संस्थापक नीलकंठ शिंदे सर यांनी आषाढी एकादशीनिमित्त  वृक्षारोपण करून एकादशीचा सन  उत्साहात साजरा करण्यात आला . या शहरातील प्रमुख मार्गावरून वर्षभरातील प्रमुख चार एकादशीनिमित्त  कर्नाटक , कोकणातून अनेक पालखी सोहळे व दिंडी पायी शहरातील मार्गाने जातात ऊन ,वारा ,पावसाची तमा न बाळगता जातात त्यांना या मार्गात विसावा मिळावा म्हणून सदरचा उपक्रम शहीद अशोक कामटे संघटनेने राबविला असल्याचे सांगितले , पुढील काळात देखील समाज उपयोगी उपक्रम व वृक्षारोपण करणार असल्याचे संस्थापक नीलकंठ शिंदे सर यांनी सांगितले.स्टेशन रोड, महात्मा फुले चौक ते नेहरू चौक या परिसरात वृक्षारोपणामुळे पुढील काळात तापमान संतुलित राहण्यास मदत होणार आहे, या भागातील व्यापारी व नागरिकांनी आपल्या जागेसमोर एक वृक्ष लागवड करावी. नवीन पिढीमध्ये वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन करण्याची आवड व गोडी निर्माण व्हावी, याकरिता शहीद अशोक कामटे संघटनेचे कार्य, प्रयत्न सुरू आहेत. यावेळी शहीद अशोक कामटे संघटनेचे सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments