ओला उबेर कंपनीच्या गाड्या बुक करून चालकांना लुटणारा एमआयडीसी पोलिसांनी केला जेरबंद* - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, July 10, 2024

ओला उबेर कंपनीच्या गाड्या बुक करून चालकांना लुटणारा एमआयडीसी पोलिसांनी केला जेरबंद*

 ओला उबेर कंपनीच्या गाड्या बुक करून चालकांना लुटणारा एमआयडीसी पोलिसांनी केला जेरबंद


शिरूर (कटूसत्य वृत्त ):-दिनांक 6/7/2024 रोजी रात्रीच्या वेळेस पिंपरी चिंचवड पुणे येथून ओला उबेर कारचालक दत्ता बामाजी फड यांना रांजणगाव गणपती येथे देव दर्शनाला जायचे आहे असे सांगून एका अनोळखी व्यक्तीने गाडी बुक केली होती त्यानुसार कारचालक दत्ता फड हे सदर अनोळखी व्यक्तीला घेऊन रात्री दोन वाजून पंधरा मिनिटांनी रांजणगाव गणपती येथील पार्किंग जवळ आले असता कारचालक यांनी अनोळखी व्यक्ती कडे गाडीचे भाडे मागितले त्यावेळेस सदर व्यक्तीने त्याच्या आणखी एका साथीदारास त्या ठिकाणी बोलवून घेतले कार मालक दत्ता फड यांस दोन्ही अनोळखी व्यक्तीने शिवीगाळ व दमदाटी करण्यात सुरुवात केली व कार चालक यांच्या जवळील पंधरा हजार रुपये किमतीचा एम आय कंपनीचा मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घेऊन तेथून ते फरार झाले हा सर्व घडलेला प्रकार ओला उबेर कार चालक दत्ता फड यांनी तक्रार देऊन रांजणगाव पोलीस स्टेशन येथे सर्व हाकिकत सांगितले सदर तक्रारीची दखल घेत दोन्ही अनोळखी व्यक्तीविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा रांजणगाव पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आला 

  ... सदर गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक  महादेव वाघमोडे व सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज कुमार नवसरे यांनी तपास पथकातील पोलीस कर्मचाऱ्यांना पुण्यातील आरोपींच शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणण्याबाबत सूचना दिल्या होत्या त्यानुसार रांजणगाव पोलीस स्टेशन येथील सहाय्यक फौजदार दत्तात्रय शिंदे उमेश कुतवळ यांनी रांजणगाव परिसरातील वेगवेगळ्या भागातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासून पुण्यातील आरोपी हे शोधून काढले आरोपी गुरुपरीत इंद्रजीत सिंग व दुसरे आरोपी कृष्णा सतीश टांगतोडे सध्या राहणार रांजणगाव गणपती  यांना अटक करून सदर गुन्हामधी चोरलेला पंधरा हजार रुपये किमतीचा मोबाईल जमा केला 

     . सदरची कामगिरी मा पंकज देशमुख सो पोलीस अधीक्षक सो पुणे ग्रा मा रमेश चोपडे सो अप्पर पोलीस अधीक्षक पुणे श्री प्रशांत ढोले उपविभागीय अधिकारी शिरूर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज कुमार नवसारे सहाय्यक फौजदार दत्तात्रय शिंदे पोलीस कॉन्स्टेबल उमेश कुतवळ पोलीस हवालदार विलास आंबेकर यांनी केले या घटनेतील पुढील अधिकचा तपास सहाय्यक फौजदार दत्तात्रय शिंदे रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन करत आहेत गेल्या आठवड्यापासून रांजणगाव औद्योगिक वसाहतीमध्ये व परिसरामध्ये होणाऱ्या चोरांना आळा घालण्यासाठी रांजणगाव पोलीस स्टेशन यांच्या वतीने अनेक उपाय योजना करण्यात येत असून अनेक गुन्हेगारांना जरब बसवण्यासाठी पोलीस स्टेशन कडून जनतेच्या हिता साठी कठोर पावले उचलत असून अशा कारवाया झाल्यामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages