मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना" रांजणगाव गणपती येथे आज प्रारंभ
शिरूर (कटूसत्य वृत्त ):- महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सर्व पात्र महिलांनी लाभ घ्यावा असे आवाहन शिरूरचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांनी केले. रांजणगाव गणपती ता.शिरूर येथे महाराष्ट्र शासनाच्या " मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण " योजना शिबिराच्या उदघाटन प्रसंगी तहसीलदार म्हस्के बोलत होते.यावेळी गटविकास अधिकारी महेश डोके,आंबेगाव-शिरुर विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मानसिंगभैय्या पाचुंदकर पाटील,मा.जिल्हा परीषद सदस्या सौ.कविताताई खेडकर,प्राध्यापक माणिक खेडकर सर, रांजणगाव गणपतीच्या प्रथम महिला लोकनियुक्त सरपंच सौ.सुवर्णाताई ज्ञानेश्वर वायदंडे,उपसरपंच श्रीकांत प्रभाकर पाचुंदकर पाटील, आंबेगाव -शिरुर विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष दत्तात्रय लांडे,रांजणगाव गणपतीचे ग्रामपंचायत सदस्य, निलेशबापू लांडे, आत्माराम खेडकर,सौ.वर्षाताई धनंजय खेडकर,सौ.लताबाई लांडे,सौ.शोभाताई शेळके, सौ.शितल निलेश पंचमुख,सौ.अर्चनाताई शिंदे,ग्रामविकास अधिकारी गंगाधर देशमुख,एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी निर्मला चोभे, वैशाली सटाले,पर्यवेक्षिका माणिक देडगे,रांजणगाव गणपतीचे सरपंच मोहनदादा शेळके, विशाल खेडकर,सौ.निलमताई पाचुंदकर पाटील, धनंजय खेडकर, ज्ञानेश्वर वायदंडे महेश शेळके,आदीसह रांजणगाव गणपतीचे सर्व आजी माजी पदाधिकारी,सर्व अंगणवाडी सेविका,आणि ग्रामस्थ महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या योजने अंतर्गत महिलाना दरमहा १५०० रुपये दिले जाणार असून हि रक्कम थेट महिलाच्या बँक खात्यात जमा होणार आहे.त्यामुळे बँक मध्ये खाते नसणाऱ्या महिलांची खाती उघडण्यासाठी रांजणगाव ग्रामपंचायतिच्या वतीने महिलांना विना मोबदला बँक खाते उघडून बँक पासबुक,चेक बुक व ए टी एम कार्ड उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे उपसरपंच श्रीकांत प्रभाकर पाचुंदकर पाटील यांनी यावेळी सांगितले.
राज्याचे सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील साहेब यांच्या सुचनेनुसार आंबेगाव-शिरुर विधानसभा मतदारसंघातील ४२ गावात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने साठी प्रशासनाच्या वतीने गावन्याही शिबीर आयोजित करण्यात येणार आहे
माझी लाडकी बहीण योजनेच्या शिबिराचे उत्कृष्ट आयोजन केल्याबद्दल ग्रामपंचायतचे तहसीलदार म्हस्के व गटविकास अधिकारी डोके यांनी यावेळी कौतुक केले.
योजनेचे अर्ज गाव,वाड्या वस्ती वरील महिलांना देण्यात येत असून या योजने पासून पात्र महिला वंचीत राहणार नाहीत याची दक्षता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्येकर्ते व पदाधिकारी घेणार असल्याचे आंबेगाव-शिरुर विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मानसिंगभैय्या पाचुंदकर पाटील यांनी यावेळी सागिंतले*.

No comments:
Post a Comment