वशिल्याच्या दर्शणार्थींनी मांडला उच्छाद
मंत्री , सदस्य , अधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपामुळे
सरकारची प्रतिमा डागाळतेय !
ऐन एकादशी दिवशी अधिकाऱ्यांच्या परिवारासाठी मंत्र्याचे पत्र
पंढरपूर (कटूसत्य वृत्त ):-आषाढी यात्रेसाठी येणाऱ्या लाखो भाविकांसमोर आपली प्रतिमा निर्मिती व्हावी त्यासाठी कोट्यावधी रुपयांच्या माध्यमातून शासकीय योजना , वैद्यकीय मदत पोहोचविणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नांना निष्प्रभ करण्याचे काम सध्या वशिल्याच्या दर्शनामुळे होत आहे.भर दिवसा रांगेमध्ये घुसणारे मंत्री , आमदार , त्यांचे कार्यकर्ते , शासकीय अधिकारी आणि मंदिर समितीचे सदस्यांचे वशिल्याचे दर्शणार्थी पाहून भाविकांचा संताप अनावर होत आहे.सुमारे 20 ते 22 तास रांगेमध्ये उभारून दर्शन घेत असताना सुमारे सहा ठिकाणी रांगेत घुसखोरी होऊन वशिल्याच्या लोकांना सोडले जात असल्याचे उघड उघड दिसत आहे. त्यामुळे भाविक देखील आता सरकारच्याच या घटकांनी मांडलेल्या उच्छादामुळे हैराण झाले आहेत.
मंत्री संदिपान भुमरे यांनी काल 50 लोकांना घेऊन घुसखोरी करत व्हीआयपी दर्शन घेतल्याची घटना ताजी असतानाच आता उद्योग मंत्री उदय सावंत यांनी ऐन एकादशीच्या दिवशी लोकांना घेऊन घुसखोरी करत व्हीआयपी दर्शन घेतले

No comments:
Post a Comment