मुक्ताई पालखी सोहळ्याला ११ वर्षापासुन मध्य प्रदेशच्या शेतकर्याची बैलजोडी,पालखीवर माढ्यात जेसीबीने पृष्पवृष्टी
माढा (कटूसत्य वृत्त):- ३१५ वर्षापुर्वीची पंरपरा असलेला आणी आषाढी वारी च्या सोहळ्यात विशेष महत्व असलेल्या मुक्ताई पालखी सोहळ्याचे माढा शहरात जल्लोषात स्वागत करण्यात आले.पालखी सोहळा माढ्यात येताच माढा नगरपंचायत च्या वतीने २ जेसीबी द्वारे पुष्पवृष्टी करण्यात आली.या पालखी सोहळ्याच्या रथाला ११ वर्षापासुन मध्य प्रदेश मधील शेतकरी प्रकाश रामू पाटील (मध्यप्रदेश) नाचनखेडा यांच्या बैलजोडीचा मान दिलेला आहे.यंदा ही तो कायम आहे.लोकप्रतिनिधीसह प्रशासनाच्या वतीने स्वागत झाले.
0 Comments